शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हडपसर-हवेली महापालिका

By admin | Updated: May 14, 2015 04:15 IST

हडपसर-हवेली या स्वतंत्र महापालिकेच्या स्थापनेबाबत राज्य शासनाने पालिका प्रशासनाकडून अभिप्राय मागविला होता. या अभिप्रायावर तटस्थ

पुणे : हडपसर-हवेली या स्वतंत्र महापालिकेच्या स्थापनेबाबत राज्य शासनाने पालिका प्रशासनाकडून अभिप्राय मागविला होता. या अभिप्रायावर तटस्थ भूमिका घेत महापालिका प्रशासनाकडून नव्या महापालिकेचा निर्णय मुख्य सभेच्या कोर्टात ढकलला आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत फेरबदल होणार असल्याने त्यावर मुख्य सभेनेच निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बुधवारी दिली. येत्या २० मे रोजी होणाऱ्या मुख्य सभेत या नव्या महापालिकेच्या स्थापनेसाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.पुणे महापालिका हद्दीलगतची ३८ गावे पालिकेत समाविष्ट करण्यास मुख्य सभेने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे आहे. मात्र, गावांच्या समावेशाऐवजी हडपसर-हवेली या स्वतंत्र महापालिकेची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालीन आमदार महादेव बाबर यांनी २०१३ मध्ये मुख्यमंत्र्यांकडे या स्वतंत्र महापालिकेच्या स्थापनेची मागणी केली होती. यंदाच्या अधिवेशनात हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनी हडपसरसाठी स्वतंत्र महापालिकेच्या स्थापनेची मागणी केली होती. त्यावर नगरविकास खात्याने मार्च महिन्यात महापालिकेकडून हडपसर-हवेली या स्वतंत्र महापालिकेच्या स्थापनेबाबत अभिप्राय मागविला होता. महापालिकेच्या संमतीने महापालिका हद्दीत शासनाकडून फेरबदल करण्याची तरतूद आहे. तसेच स्वतंत्र महापालिकेच्या स्थापनेमुळे पुणे पालिकेच्या हद्दीत फेरबदल होणार आहे. त्यामुळे मुख्य सभेनेच निर्णय घ्यावा, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.