हडपसर ते चौफुला पीएमपीएल फेरीचे येत्या रविवारी शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:15 IST2021-06-16T04:15:13+5:302021-06-16T04:15:13+5:30

पीएमपीएलचे पुणे महाव्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी ६ महिन्यांपूर्वी पीएमपीएल योजना हडपसर ते यवतपर्यंत सुरू केली होती. सदर सुविधा हडपसर ...

Hadapsar to Chaufula PMPL round kicks off next Sunday | हडपसर ते चौफुला पीएमपीएल फेरीचे येत्या रविवारी शुभारंभ

हडपसर ते चौफुला पीएमपीएल फेरीचे येत्या रविवारी शुभारंभ

पीएमपीएलचे पुणे महाव्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी ६ महिन्यांपूर्वी पीएमपीएल योजना हडपसर ते यवतपर्यंत सुरू केली होती. सदर सुविधा हडपसर ते यवतऐवजी हडपसर ते चौफुलापर्यंत सुरू करावी अशी मागणी रमेश थोरात यांनी निवेदनाद्वारे जगताप यांच्याकडे केली होती. सोबत परिसरातील खुटबाव, भांडगाव ,खोपोडी, दापोडी, पडवी आदी ग्रामपंचायतींचे ठराव जोडले होते. मध्यंतरी कोविडमुळे दोन महिने पीएमपीएल सुविधा बंद होती. गेल्या काही दिवसांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. त्यानंतर राजेंद्र जगताप यांनी फोनवरून ही सुविधा आपण यवतऐवजी यवतपासून १३ किलोमीटर पुढे चौफुलापर्यंत सुरू करत असल्याचे सांगितले. यासंदर्भात रमेश थोरात म्हणाले की, चौफुला हा परिसरातील ३२ गावांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते.

त्यांनी मांडलेली भूमिका व लोकांच्या मागण्या ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवले व त्याला अखेर यश आले त्यामुळे नागरिकांना ‘लोकमत’चे धन्यवाद व्यक्त केले.

-

Web Title: Hadapsar to Chaufula PMPL round kicks off next Sunday