शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीच्या नगराध्यक्षपदी ज्ञानेश्वरी बारभाई ?

By admin | Updated: July 5, 2015 00:27 IST

येत्या ८ जुलै रोजी होणाऱ्या जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नगरसेविका ज्ञानेश्वरी बारभाई यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

जेजुरी : येत्या ८ जुलै रोजी होणाऱ्या जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नगरसेविका ज्ञानेश्वरी बारभाई यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. केवळ घोषणा होणे बाकी आहे.दि. २ ते ४ जुलै दरम्यान नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दि. ७ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. ८ जुलै रोजी पीठासन अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. याच दिवशी उपाध्यक्ष पदाचीही निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शनिवारी शेवटचा दिवस असल्याने या पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका ज्ञानेश्वरी बारभाई यांनी ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई, प्रभारी नगराध्यक्षा साधना दरेकर, प्रभारी उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, नगरसेवक लाला अण्णा जगताप, नगरसेविका अमृता घोणे, साधना दीडभाई, संगीता जोशी, सोनाली मोरे, सुरेखा सोनवणे यांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज भरला. मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी तो स्वीकारला. जेजुरी नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असून येत्या ८ जुलै रोजी बारभाई यांची निवड निश्चित मानली जात आहे. यानंतर याच दिवशी पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक लाला अण्णा जगताप यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. (वार्ताहर)