ग्रीन फाउंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:08 IST2021-07-24T04:08:17+5:302021-07-24T04:08:17+5:30

यावेळी राजेंद्र काळभोर यांच्या हस्ते तिर्थक्षेत्र रामदरा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे ...

Gurupournima celebrations on behalf of Green Foundation | ग्रीन फाउंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

ग्रीन फाउंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

यावेळी राजेंद्र काळभोर यांच्या हस्ते तिर्थक्षेत्र रामदरा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे लोणी काळभोर येथे परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे व समाजभूषण गणपतराव काळभोर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हायस्कूलचे मुख्याध्यापक सिताराम गवळी, समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिलकुमार कुरणे , साधना सहकारी बँक माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब कोळपे, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर यांचा ग्रीन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्या हस्ते शाल नारळ देऊन सर्व शिक्षक गुरूजनांसोबत गुरुपौर्णिमा तसेच वनसंवर्धन दिन साजरा करण्यात आला.

यावेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप,विश्वजीत काळभोर,मयुर चौधरी, बिरूदेव भास्कर, जीवन जाधव, किरण बाचकर, राहुल कुंभार, किरण भोसले, विजय बोडके, तसेच विभा गिरिश ट्रस्ट पुणे, जनाई शिक्षण संस्था पुणेचे पदाधिकारी व लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Gurupournima celebrations on behalf of Green Foundation