‘यूपी’चा बंदूकबाज पुण्यात पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:18 IST2021-02-23T04:18:09+5:302021-02-23T04:18:09+5:30

पुणे : उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. राकेश त्रिलोक यादव (वय ३१, रा. ...

UP gunman caught in Pune | ‘यूपी’चा बंदूकबाज पुण्यात पकडला

‘यूपी’चा बंदूकबाज पुण्यात पकडला

पुणे : उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. राकेश त्रिलोक यादव (वय ३१, रा. नांदेड फाटा, मूळ उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व काडतुसे असा २४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी तानाजी सागर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. राकेश यादव विरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक उसगावकर व कर्मचारी सागर हे गस्तीवर असताना कोठारी ब्लॉक रोडवरील फ्लेमिंगो हॉटेलच्या बाहेरील फुटपाथवर एक व्यक्ती कंबरेला पिस्तूल लावून थांबलेली असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून यादवला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता बेकायदा पिस्तूल सापडले.

Web Title: UP gunman caught in Pune