शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गंजी लावलेल्या कडब्याला चढा दर

By admin | Updated: May 9, 2017 03:30 IST

सध्या दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे तालुक्यातील असलेल्या सर्वच विहिरींनी तळ गाठले आहेत. पाणी नसल्याने पिके जळू लागली आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवडापुरी : सध्या दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे तालुक्यातील असलेल्या सर्वच विहिरींनी तळ गाठले आहेत. पाणी नसल्याने पिके जळू लागली आहेत. त्यामुळे सध्या जनावरांना हिरवा चारा मिळत नसल्याने गंजी लावलेल्या कडब्यालाच चढ्या भावाने खरेदी करताना तालुक्यातील शेतकरी दिसत आहेत.गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले होते. कडबा चांगल्या प्रमाणात निघाल्यामुळे चारा उपलब्ध झाला होता. तसेच मकापिकसुद्धा चांगल्या प्रमाणात लावल्यामुळे मकवनसुद्धा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध झाले होते. शेतकऱ्यांनी चारा उपलब्ध असावा, म्हणून मोठ्या प्रमाणात कडबा मकवन खरेदी केले होते. परंतु ते संपत आल्याने उन्हाळ्यात आणखी खरेदी करण्यासाठी शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांकडे फिरत आहेत. परंतु उन्हाळ्यात विहिरींनी तळ गाठल्यामुळे हिरवा चारा उपलब्ध नसल्याने गंजी लावलेल्या कडब्याला व रानात असलेल्या मकवनाला चढा दर मिळत आहे. सध्या कडक दुष्काळात जनावरांना जगविणे मोठ्या जिकीरीचे झाले आहे. चाऱ्याला उन्हाळ्यात सोन्याचे दिवस आल्याचे ग्रामीण भागामध्ये पाहावयास मिळत आहे.