पुण्यात होणार किराणा घराण्याचे संशोधन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:30+5:302021-02-05T05:02:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अभिजात संगीतामध्ये किराणा घराण्याचे स्वतंत्र स्थान आहे. या घराण्याची आणि या घराण्याला समृद्ध करणाऱ्या ...

Grocery research center to be set up in Pune | पुण्यात होणार किराणा घराण्याचे संशोधन केंद्र

पुण्यात होणार किराणा घराण्याचे संशोधन केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अभिजात संगीतामध्ये किराणा घराण्याचे स्वतंत्र स्थान आहे. या घराण्याची आणि या घराण्याला समृद्ध करणाऱ्या कलाकारांची माहिती संकलित करणारे किराणा घराण्याचे संशोधन केंद्र पुण्यात विकसित होत आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी किराणा घराण्याचे संशोधन केंद्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आपल्याकडे कलाकार हे केवळ आपली साधना आणि कला सादरीकरणावर लक्ष केंद्रित करतात. मात्र, त्याचे दस्तऐवजीकरण करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे असे दिसून येते. त्यामुळे शास्त्रीय संगीतातील किराणा घराणे, या घराण्याचे महत्त्व, या घराण्यातील कलाकारांची माहिती आणि त्यांची वैशिष्ट्ये यासंबंधीची माहिती एका छताखाली आणण्याच्या दृष्टिकोनातून किराणा घराण्याचे संशोधन केंद्र विकसित करण्याचा संकल्प केला आहे. नव्या पिढीचे कलाकार आणि संगीताचा अभ्यास करणाऱ्यांना या केंद्राचा लाभ होईल, असे डॉ. प्रभा अत्रे यांनी सांगितले.

या केंद्रासाठी संगीतप्रेमी रसिकांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील ग्रंथ, मासिके, स्मरणिका, दृक-श्राव्य ध्वनिफिती, सीडी हे साहित्य द्यावे. डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन, स्वरमयी गुरुकुल, जंगली महाराज रस्ता, संभाजी उद्याानासमोर, पुणे ४११००४ या पत्त्यावर दुपारी चार ते रात्री आठ या वेळात आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Grocery research center to be set up in Pune