शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आंदोलनकर्त्यांबरोबर

By admin | Updated: March 13, 2015 06:27 IST

फोर्स मोटर्सच्या कामगारप्रश्नी तोडगा काढण्यासाठी बोलावूनसुद्धा कंपनी व्यवस्थापनाचे कोणीही चर्चेसाठी आले नाही. चर्चेतून तोडगा निघू शकतो.

पिंपरी : फोर्स मोटर्सच्या कामगारप्रश्नी तोडगा काढण्यासाठी बोलावूनसुद्धा कंपनी व्यवस्थापनाचे कोणीही चर्चेसाठी आले नाही. चर्चेतून तोडगा निघू शकतो. कामगार कुटुंबीयांनी पाच दिवस उपोषण केले. आता उपोषण थांबवा, साखळी पद्धतीने आंदोलन सुरू ठेवा. कामगारांच्या न्याय, हक्काच्या लढ्यात सरकार तुमच्याबरोबर आहे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून अशी ग्वाही देतो, असे स्पष्ट करून शासनाकडून जे कृतिशील पाऊल उचलायचे ते उचलले आहे, असे कामगार राज्यमंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितले.चिंचवड, काळभोरनगर येथे आंदोलनस्थळी कामगार राज्यमंत्री मेहता यांनी गुरुवारी भेट दिली. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘गेल्या वीस वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना तुटपुंजे वेतन दिले जात आहे. २००१ पासून वेतनवाढीचा करार होत नाही. कंपनीत दोन संघटना आहेत, त्यात मान्यताप्राप्त संघटना कोणती? असा वाद निर्माण झाला आहे. त्याचा गैरफायदा व्यवस्थापनाकडून उठविला जात असून, त्यात कामगार भरडला जात आहे. तोडगा काढायचा असेल, तर आमची कधीही चर्चेची तयारी आहे. त्यासाठी सरकार कामगारांच्याबरोबर आहे. ’’ भारतीय कामगार सेनेचे नेते सूर्यकांत महाडिक यांच्याशीदेखील चर्चा करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी राज्यसभेचे उमेदवार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, भाजपाचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एकनाथ पवार, नामदेव ढाके, उमा खापरे, राजू दुर्गे, राजेश पिल्ले, नगरसेवक दत्ता साने, जगदीश शेट्टी, मंगला कदम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)