शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

गोपीनाथ मुंडे म्हणाले होते ; अनिलचे नाही माझेच कापले तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 3:47 PM

अनिल शिरोळे यांचे तिकीट कापले जाण्याची ही पहिली वेळ नाही़. यापूवीर्ही त्यांचे तिकीट ऐनवेळी कापण्यात आले होते.

पुणे : विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कापून भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अनिल शिरोळे यांचे तिकीट कापले जाण्याची ही पहिली वेळ नाही़. यापूवीर्ही त्यांचे तिकीट ऐनवेळी कापण्यात आले होते. पुणे महापालिकेच्या २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अनिल शिरोळे यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी अनिल शिरोळे यांचे नाही तर माझेच तिकीट कापले, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला होता.

गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा संच पुणे शहरात कार्यरत होता. त्याचे नेतृत्व अनिल शिरोळे हे करीत असत. पुणे महापालिकेच्या २००७ मधील निवडणुकीच्या वेळी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यात राजकीय शितयुद्ध सुरु होते. त्यातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत अनिल शिरोळे यांना तुम्हाला तिकीट देणार हे सांगितले. त्यामुळे ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असताना ऐनवेळी त्यांना तुम्हाला तिकीट देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याऐवजी विकास मटकरी यांना तिकीट देण्यात आले होते.

ही बाब शहरातील मुंडे समर्थकांना समजल्यानंतर त्यांनी भाजपच्या त्यावेळच्या जोगेश्वरी मंदिराशेजारी कार्यालयात जाऊन एकच गोंधळ घातला होता. त्यानंतर मुंडे समर्थक कार्यकर्ते मुंबईला जाऊन गोपीनाथ मुंडे यांना भेटले होते. त्यावेळी मुंडे यांनी अनिल शिरोळे यांचे नाही तर माझेच तिकीट कापले अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या ऐवजी विकास मठकरी यांना तिकीट देण्यात आले होते. त्यानंतर शहराध्यक्ष पदासाठी झालेल्या पक्षांतर्गत मतदानात मुंडे गटाचे योगेश गोगावले यांना सर्वाधिक पसंती दर्शविण्यात आली होती. असे असतानाही विकास मठकरी यांना शहराध्यक्ष करण्यात आले. त्यावेळीही मुंडे समर्थकांना डावलण्यात आल्याने पक्षातील संदोपसंदी समोर आली होती. आपली सर्वत्र कोंडी केली जात असल्याचे दिसल्यावर गोपीनाथ मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींना थेट पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी मुंडे यांची समजूत घातल्यानंतर मुंडे यांचे बंड थंड झाले. त्यावेळी तडजोड होऊन अनिल शिरोळे यांना शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. २०१४ मध्ये पुन्हा एकदा अनिल शिरोळे की बापट असा चुरस झाली होती. मात्र, त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी आपला आग्रह शेवटपर्यंत कायम ठेवल्याने अनिल शिरोळे यांना तिकीट देण्यात आले होते. यावेळी नाराज झालेले गिरीश बापट हे सुरुवातीला प्रचारात सहभागी झाले नव्हते. 

गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा गट पुणे शहरात होता. मात्र, मुंडे यांच्या अचानक जाण्याने गेल्या तीन साडेतीन वर्षात हा गट विस्कळीत झाला. अनेकांनी काळाची पावले ओळखून जुळवून घेतले व वेगवेगळी पदे पदरात पाडून घेतली. अनिल शिरोळे यांना खासदारकी मिळाली, तरी गेल्या ५ वर्षात त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या या शांत स्वभावाचा फायदा इतरांनी उचलला. त्यामुळे मुंडे यांचे कट्टर समर्थकही दुरावले गेले. महापालिका निवडणुकीत त्यांनी या कार्यकर्त्यांसाठी आपले वजन न वापरल्याने अनेक कार्यकर्ते बाजूला गेले. २०१४ मध्ये ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे यांनी अनिल शिरोळे यांच्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे आग्रह धरला होता, असा आग्रह धरणारे आता कोणी नसल्याने तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी ज्या पद्धतीने सर्व पक्ष आपल्या बाजूने वळविला, त्यामुळे दिल्लीतही शिरोळे यांची बाजू कमी पडल्याने त्यांना दुसऱ्यांदा तिकीट कापल्याचे पहाण्याची वेळ आली. 

टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडेanil shiroleअनिल शिरोळेPuneपुणेBJPभाजपा