'गुड मॉर्निंग’ सहज निघतं, पण ‘वंदे मातरम्’ म्हणताना अडचण का? चंद्रकांत पाटलांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:07 IST2025-11-19T18:05:26+5:302025-11-19T18:07:12+5:30
आपण कोणत्या संस्कृतीचा भाग आहोत हे कळत नाही. भारतीय परंपरेतील राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’चा सन्मान करण्याची मानसिकता समाजात वाढली पाहिजे

'गुड मॉर्निंग’ सहज निघतं, पण ‘वंदे मातरम्’ म्हणताना अडचण का? चंद्रकांत पाटलांचा सवाल
पुणे: “आज आपण कोणत्या संस्कृतीचे आहोत, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. सकाळी उठल्या-बरोबर ‘गुड मॉर्निंग’ म्हणतो, पण ‘वंदे मातरम्’ नाही! वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाली तरीही त्याविषयी अडचण का?” असा सवाल उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण संचालनालयाने,पुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय(स्वायत्त),यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.१९) रोजी महाराष्ट्रातील महाविद्यालयांच्या पुरग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच्या योगदानानिमित्त 'संकटातून संकल्पाकडे' या सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण संचालक डाॅ. शैलेंद्र देवळाणकर ,प्रो.ए.सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. गजानन एकबोटे उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,“आपण कोणत्या संस्कृतीचा भाग आहोत हे कळत नाही. भारतीय परंपरेतील राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’चा सन्मान करण्याची मानसिकता समाजात वाढली पाहिजे. सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. "मराठवाड्यातील अर्वषणाच्या कठिण परिस्थितीत ज्या २० महाविद्यालयांनी मेंटर मेंटी या संकल्पनेचा अंतर्गत अतिशय मोलाची मदत केली ती उल्लेखनीय आहे. या कामाची सतत प्रेरणा मिळत रहावी .तसेच काम राष्ट्रीय सेवा योजनेने सतत करत रहावे कारण समाजसेवा ही गरजेवर आधारित संवेदनशीलतेने करणे गरजेचे असते.
डाॅ एकबोटे म्हणाले,"उच्च शिक्षणामध्ये गेल्या काही दिवसात नविन कल्पना राबविल्या आहेत. तरीदेखील एन आर एफ रँकिग, उच्च शिक्षणामधे सीएस आर फंडिग मधून शिक्षक भरतीचे प्रयत्न व संशोधन निधी तरतुद झाल्यास निधीची त्रुटी भरून काढता येईल का याचा विचार व्हावा.