अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:37 IST2025-01-04T12:36:36+5:302025-01-04T12:37:31+5:30

झोपलेले सरकार जागे व्हा :बारामती प्रशासकीय भवना समोर ठिय्या 

Give severe punishment to the man who tortured and murdered his minor sisters | अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्या

अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्या

सांगवी (बारामती) : झोपलेले सरकार जागे व्हा, पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगर येथील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर खाऊच्या आमिषाने झालेला अत्याचार  व नंतर निर्घुण हत्ये प्रकरणी नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा देऊन बालिकांना न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करत बारामतीच्या प्रशासकीय भवना समोर गोसावी समाजाच्या वतीने संतप्त प्रतिक्रिया देऊन आक्रोश करत विविध मागण्या केल्या. अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी गोसावी समाजाच्या वतीने करण्यात आली. 

राजगुरुनगरमध्ये बलात्कार करून हत्या करणारा हॉटेलमधील वेटर अजय दास (वय ५४, रा. पश्चिम बंगाल) याने आठ व नऊ वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची निर्घुण हत्या करून दोघींचेही मृतदेह दोन दिवस पाण्याच्या बॅरलमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. राजगुरूनगर येथे घराबाहेर खेळत असताना दोन चिमुकल्या सख्या बहीणी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह एका बॅलर मध्ये आढळून आले होते.

राजगुरूनगर येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणाचे पडसाद बारामतीत उमटताना दिसले. या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत नागरिकांनी आंदोलन केलं आहे.  बारामती प्रशासकीय भवना समोर लहान मुलींपासून अबाल वृध्द महिलांनी ठिय्या दिला.

गोसावी समाजाच्या वतीने निवेदन
गोसावी समाजातील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली २५ डिसेंबर २०२४ रोजी घरातून अचानक गायब झाल्याने अनेकदा शोधाशोध केल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिल्यानंतर त्यांना काही वेळानंतर अत्यंत निंदनीय अशी घटना समोर आली.

दोघींची निर्घुण हत्या करण्यात करण्यात आली या घटनेने संपुर्ण महाराष्ट्रा  मधील गोसावी समाजास या घटनेने पूर्ण हादरून टाकले होते. तसेच कोणी नराधमाने हे कृत्य केले आहे, त्याला योग्य ते शासन झालेच पाहिजे. सदर आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशा दृष्ट विकृत प्रवृत्तीना आळा बसावा पुन्हा असे प्रकार घडु नयेत म्हणून आमच्या गोसावी समाजास न्याय मिळावा. पीडीत कुटूबियांना योग्य न्याय मिळावा असे बारामतीचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात गोसावी समाजाच्या वतीने म्हटले आहे.

Web Title: Give severe punishment to the man who tortured and murdered his minor sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.