"तुझ्याकडचे पैसे दे नाहीतर तुला मारून टाकेन" धमकी देत तरुणांना लुटले

By भाग्यश्री गिलडा | Updated: January 19, 2024 14:10 IST2024-01-19T14:09:58+5:302024-01-19T14:10:35+5:30

लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली

Give me your money or I will kill you and robbed | "तुझ्याकडचे पैसे दे नाहीतर तुला मारून टाकेन" धमकी देत तरुणांना लुटले

संग्रहित छायाचित्र

पुणे : चारचाकी वाहनातून जाणाऱ्या प्रवाशाला रस्त्यात अडवून त्याला धमकी देत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका अनोळखी व्यक्तीसह ऋषिकेश सुरेश पवार (२५), गौरव सोनावणे  (२१), चंद्रकांत सोनावणे (२१), सागर गणपत पवार (२६) (सर्व रा. घोरपडे वस्ती, लोणीकाळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

याबाबत लोणीकाळभोर परिसरात राहणाऱ्या राजेश बाळासाहेब काळभोर (३१) यांनी गुरुवारी (दि. १८) पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार १७ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या कारमधून मित्राला भेटायला निघाले होते. त्यावेळी लोणीकालबोर बाजारमळा रस्त्यावर नमूद आरोपींनी फिर्यादींच्या गाडीच्या काचेवर दगड फेकून गाडीची काच फोडली. फिर्यादींनी गाडी थांबवल्यावर ऋषिकेश पवार आणि गौरव सोनावणे याने फिर्यादींना गाडीतून उतरायला सांगितले. फिर्यादी गाडीतून उतरल्यावर "तुझ्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे काढून दे नाहीतर तुला जीवे मारून टाकेन" अशी धमकी दिली. दीर्यादींनी प्रतिकार केला असता ऋषिकेश पवार याने जबरदस्तीने फिर्यादींच्या खिशातील ३ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर सर्व आरोपी मोटारसायकलवर पळून गेले. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Give me your money or I will kill you and robbed