'बंडूअण्णा आणि इतर आरोपींना फाशी किंवा जन्मठेप द्या', कल्याणी कोमकर यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:23 IST2025-09-12T18:14:25+5:302025-09-12T18:23:42+5:30
अण्णांच्या अंगाखांद्यावर वाढलेला तो त्याचं नाव पण प्रेमाने त्यांनीच गोविंदा ठेवलं, स्वतःच्या नातवाला मारताना त्यांना दया आली नाही का?

'बंडूअण्णा आणि इतर आरोपींना फाशी किंवा जन्मठेप द्या', कल्याणी कोमकर यांची मागणी
पुणे: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नानापेठ परिसरामध्ये गोविंदा उर्फ आयुष कोमकर या युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. खरंतर हे सगळं प्रकरण पूर्व वैमनस्यातून झाल्याचं आणि बदलीच्या भावनेतून झाल्याचे आरोप होत आहेत. या सगळ्या प्रकरणावर आयुषची आई कल्याणी यांनी बंडूअण्णा आंदेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर बरोबर एक वर्षांनी गणेश कोमकरचा मुलगा आयुष्य याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आंदेकर कुटुंबीयांनी हा कट रचल्याचा आरोप होऊ लागला आहे. गणेश कोमकरच्या पत्नीनेही बंडूअण्णा आंदेकर यांच्यावर आरोप करत सगळं काही सांगितलं आहे.
कल्याणी म्हणाल्या, बंडूअण्णा आता म्हणताहेत की आयुष्य हा माझा नातू आहे. मी असं करणार नाही. मी ठामपणे सांगू शकते की, त्यांचा प्लॅनच असतो की आम्ही बाहेर जातो. तुम्ही हे करा म्हणजे आमच्यावर नाव येणार नाही. मी त्यांना चांगलीच ओळखून आहे. त्यामुळे मी म्हणते आता त्यांना आत ठेवले तर बाहेर येऊनच देऊ नका. त्यांना फाशीची शिक्षा नाहीतर जन्मठेप असं काहीतरी होऊद्या अशी मागणी त्यांनी लोकमतशी बोलताना त्यांनी केली आहे. पुण्यातला दहशतवाद थांबवण्यासाठी त्यांना सोडूच नये. पोलिसांनी आणि अजित दादा, देवेंद्र फडणवीसांनी जातीने आमच्याकडं लक्ष द्यावं. आमचा मुलगा कशातच नव्हता. त्याला फक्त न्याय मिळवून द्यावा. तो इतका साधा होता. त्यांनी आम्हाला सांभाळलं. आमच्याकडं लक्ष दिलं म्हणजे तो इतका समजूतदार होता की यात कशातच तो नव्हता. माझी हीच विनंती मी त्याच्यासाठी जास्त काहीच करू शकले नाही. मला फक्त आता त्याच्यासाठी न्याय पाहिजे.
बंडूअण्णा हे माझा नातू असल्याची भावनिक साथ ते खरंतर कोर्टामध्ये घालताना दिसतायेत. आम्ही महाराष्ट्रात नव्हतो केरळला होतो असेही ते कोर्टात म्हणाले. याबाबत बोलताना कल्याणी म्हणाल्या, त्यांना काळीज कसं नाही. त्यांच्याच अंगाखांद्यावर वाढलेला तो त्याचं नाव पण प्रेमाने त्यांनीच गोविंदा ठेवलंय. त्याचा जन्म झाल्यावर बंडूअण्णा आणि गणेश कोमकर ते सगळे बालाजीला गेले होते. अण्णांनीच त्याचं नाव ठेवले मग एवढं त्या मुलाविषयी तरी तुम्हाला दया नाही आली. काहीच वाटलं नाही. बदला घ्यायचा होताना आणि कसला बदला आम्ही काय केलंच नाहीये. गणेशने त्याच्या मृतदेहावर हात ठेवून शपथ घेतली की, मी काहीच केलं नाही तरी मी ही शिक्षा भोगतोय. हे सगळे राजकीय दबाव टाकतायेत. त्यांचा सगळा पैशावर खेळ आहे. पण आज निष्पाप मुलाचा जीव गेला. आणि आता अजूनही कृष्णा, शिवम, अभिषेक, लक्ष्मी, आंदेकर हे सगळे फरार आहेत. तर अजून आमच्या जीवाला धोका आहे. आमच्या घरात मुलं आहेत. त्यांचा पण जीव धोक्यात आहे. ते आज घराबाहेर जाऊ शकत नाहीत. वनराज आंदेकरांचा खून आम्ही केला नसताना आम्ही एवढं भोगलं. तेव्हा सगळे आमच्या विरोधातच बोलत होते की. आम्हीच केलं बहिणींनी सुपारी दिली कोणी बाईला आम्ही सुपारी दिली का? आम्ही कोणाशी बोलताना पाहिलं काहीच नाही आणि दाजींनीच खून केला मेव्हण्याचा असे पण म्हणत होते.
आमच्याच लोकांनी आमचा घात केलाय हे मी ठामपणे सांगू शकते. कारण का ती मुलं त्यांचीच आहेत. आणि आता फरार अण्णा जेव्हा सापडले तेव्हाच ती दोन मुलं पण सापडली. मग ती मुलं त्यांच्याबरोबर सापडलीच कशी? असं मी म्हणते. बरं. पण आता या प्रकरणामध्ये बरेच जणांना अटक पण झालेली आहे. त्यांना पोलीस कोठडी पण सुनावलेली आहे. या सगळ्या प्रकरणात अजूनही FIR किंवा गुन्हे दाखल झालेले नाहीयेत. पोलीस आम्हालाही फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला येऊन देत नाहीत. पोलिसांनी अजूनपर्यंत आमची नीट बाजू व्यवस्थित ऐकून घेतलेली नाहीये. ही लोकं अशी किती मोक्याचे केसेस असले की आत जातात आणि लगेच बाहेर येतात. सहा महिन्यांनी दीड वर्षांनी तर असं होता कामा नये. आता हे आत गेले तर आताच नाही का यांना जन्मठेप नाहीतर फाशी दिली पाहिजेल अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.