शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

लोणी काळभोर येथे बारावीच्या परीक्षेत कॉपी असल्याच्या संशयाने मुलीचे कपडे काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 4:15 PM

बारावीच्या परीक्षेत कॉपी असल्याच्या संशयाने आल्याने ८० मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा घृणास्पद प्रकार लोणी काळभोर येथील एमआयटी युनिव्हर्सिटीच्या विश्वराज गुरुकुल या नामांकित शाळेत घडला आहे.

ठळक मुद्देएमआयटी युनिव्हर्सिटीच्या विश्वराज गुरुकुल या नामांकित शाळेत घडला.

लोणी काळभोर : बारावीच्या परीक्षेत कॉपी असल्याच्या संशयाने आल्याने ८० मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा घृणास्पद प्रकार लोणी काळभोर येथील एमआयटी युनिव्हर्सिटीच्या विश्वराज गुरुकुल या नामांकित शाळेत घडला असून. सदर प्रकारामुळे मुलींमध्ये भींतीचे तर पालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.            सदर प्रकार येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनीसेबत घडला आहे. या ज्युनिअर कॉलेजचे वाणिज्य विभागाचे १२५ परीक्षार्थी विश्वराज गुरुकुल मध्ये परीक्षा देत असून यांमध्ये ८० मुली आहेत. २८ फेब्रुवारी रोजी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा पेपर असल्याने सर्व विद्यार्थी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गेले. मुख्य गेटमधून सर्वांना आत घेतल्यानंतर फक्त पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बाजूला घेऊन मुख्याध्यापक बाविस्कर यांनी तुम्ही परीक्षेत कॉपी करत आहात. तपासणी केल्याशिवाय तुम्हाला परीक्षेस बसता येणार नाही असे सांगितले.           त्यानंतर मुले व मुलींना वेगवेगळ्या खोलीत नेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. मुलींची तपासणी महिलांनी केली. यावेळी त्यांच्या अंगावरील अंतरवस्त्रे सोडून सर्व कपडे काढण्यात आल्याची माहिती मुलींनी दिली. सदर खोलीचा दरवाजा बंद असला तरी सर्व खिडक्या उघड्या होत्या असे मुलींनी पालकांना सांगितले. यावेळी एका मुलीने आपले पालक आल्याशिवाय तपासणी करून देणार नाही असे ठणकावून सांगितले. तिची तपासणी केली नाही. तर एका मुलीला मासिक पाळी आलेने यांसाठी तिने वापरलेले पॅडही ऊचकटून तपासण्यात आले. तपासणी मध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांकडे काहीही आक्षेपार्ह मिळून आले नाही. त्यानंतर त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला.            सदर बाब एका मुलीने आपले वडिलांना सांगितले नंतर ते दुसरे दिवशी मुख्याध्यापक बाविस्कर यांना भेटले व विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचे टाळले. सदर प्रकार सर्व पालकांना समजल्यावर आज पालकांनी बाविस्कर यांची भेट घेऊन जाब विचारला असता त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगितले. सर्व पालक संतापले व त्यांनी लोणी काळभोर पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांची भेट घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्याचे काम सुरू आहे.     

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरVinod Tawdeविनोद तावडे