शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीचे न्यूड फोटो व्हायरल; दहावीत शिकणारे विद्यार्थी ताब्यात, पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 12:56 IST

मुलीच्या आईने तक्रार दाखल करताच दहावीत शिक्षण घेणाऱ्या ३ अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

किरण शिंदे

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गात असणाऱ्या विद्यार्थिनींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनींचे फोटो मिळवले. आणि त्यानंतर मॉर्फ करत सोशल मीडियावर व्हायरल केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दहावीत शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, १६ जून ते ३० जून या कालावधीत हा प्रकार घडला. पिडीत विद्यार्थिनी आणि ताब्यात घेतलेले २ विद्यार्थी हे दहावीच्या वर्गात आहेत. तर ताब्यात घेतलेला एक जण हा शाळा सोडून गेला असला तरी सुद्धा इतर मित्रांच्या संपर्कात होत असल्याची माहिती आहे. या अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या दोन मैत्रिणींचे फोटो टेलिग्रामवरून अपलोड केले. हे फोटो मोर्फ करत न्यूड केले. आणि मॉर्फ केलेले हे फोटो शाळा सोडून गेलेल्या आपल्या तिसऱ्या मित्रांना पाठवले. हा संपूर्ण प्रकार जेव्हा शाळेतील शिक्षकांना कळला तेव्हा त्यांनी पीडित मुलींच्या कुटुंबीयांना बोलावून याची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. 

तक्रार आल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला. हे फोटो व्हायरल करणाऱ्या तीनही मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुद्धा करण्यात आले. त्यानंतर या सर्व मुलांना आज बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आर राजा यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थीEducationशिक्षणWomenमहिला