"मुझे दादाजी गोद मे बिठाकर..." पुण्यात चौथीतील मुलीने सांगितले आजोबांचे घाणेरडे कारनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 15:18 IST2023-01-11T15:10:06+5:302023-01-11T15:18:16+5:30

60 वर्षीय आजोबांविरोधात गुन्हा दाखल

girl in the fourth told the teacher about the dirty reasons of the grandfather; A case has been registered in Kondhwa Police Station | "मुझे दादाजी गोद मे बिठाकर..." पुण्यात चौथीतील मुलीने सांगितले आजोबांचे घाणेरडे कारनामे

"मुझे दादाजी गोद मे बिठाकर..." पुण्यात चौथीतील मुलीने सांगितले आजोबांचे घाणेरडे कारनामे

पुणे/किरण शिंदे : पुण्याच्या कोंढवा परिसरातील शाळेत चौथीच्या वर्गात गुड टच आणि बॅड टच याचा वर्ग सुरू असताना एक धक्कादायक प्रकार ओळखीचा. एका अकरा वर्षाच्या मुलीने आजोबा आपल्या सोबत कसे घाणेरडे चाळे करतात याचा पाढाच शिक्षकांसमोर वाचला. या प्रकरणी आता कोंढवा पोलीस ठाण्यात 60 वर्षीय आजोबांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. शाळेतील शिक्षिकेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

पीडित मुलगी ही फक्त अकरा वर्षाची आहे. कोंढवा परिसरातील एका शाळेतील शिक्षण घेते. दरम्यान शाळेतील शिक्षक चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच याची माहिती देत होते. यावेळी पीडित मुलीने डिसेंबर महिन्यात तुझ्यासोबत घडलेला प्रकार शिक्षिकेला सांगितला. "जब घर मे कोई नही होता था तब मुझे दादाजी गोद मे बिठाकर आगे पीछे करते थे" असे सांगत या चिमुरडीने आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती शिक्षकांना दिली. आजूबाजूला त्रास द्यायचे तेव्हा त्रास होत असल्याने मी ओरडायचे तेव्हा मात्र आजोबा तोंड दाबून मला गप्प करायचे. इतकेच नाही तर त्यांनी मला घाणेरडे व्हिडिओ देखील दाखवले असे या चिमुरडीने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: girl in the fourth told the teacher about the dirty reasons of the grandfather; A case has been registered in Kondhwa Police Station