शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती पट्ट्यात चौैथ्या वर्षी खरीप जाणार वाया

By admin | Updated: July 7, 2015 02:44 IST

बारामती तालुक्यातील जिरायती भागातील खरीपाच्या आशा धूसर झाल्या आहेत. विशेषत : जिरायती भागाचा मुख्य आधार असलेला खरीप हंगाम सलग चौथ्या वर्षी वाया जात आहे.

लोणी भापकर : बारामती तालुक्यातील जिरायती भागातील खरीपाच्या आशा धूसर झाल्या आहेत. विशेषत : जिरायती भागाचा मुख्य आधार असलेला खरीप हंगाम सलग चौथ्या वर्षी वाया जात आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, दुध उत्पादकांपुढे मोठेच संकट ठाकल्याचे चित्र आहे. तर ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतिक्षा करावी लागत आहे. े.यामुळे या भागातील नवीन पिढी शहराकडे स्थलांतरित होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. मोरगाव, सुपे या जिरायती पट्ट्यात खरीप हंगामातील बाजरी ,मूग ,मटकी, हुलगा, सूर्यफूल, हळवी कांदा ही पीके घेतली जातात. पुरेशा पाऊस असेल तर ही पीके केवळ पावसावरही पदरात पडतात. यासाठी मे महीन्यातील मान्सूनपूर्व रोहीणी नक्षत्रातील अवकाळी पावसाची गरज असते. त्यानंतर जून महीन्यातील मृग नक्षत्रातील ओलीवर पेरण्या मार्गी लागतात. मात्र यंदा सलग चौथ्या वर्षी मे जून मधील पावसाने हुलकावणी दिली. कमी दाबाच्या प्रभावामुळे झालेल्या थोडयाशा पावसाच्या ओलीवर या भागात बाजरी, मूग, कांदा या पीकांच्या पेरण्या उरकल्या आहेत. मात्र नंतर पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने उगवलेली पीके सुकून जात आहे.यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दिवसभर कडक ऊन व वाहणारे कोरडे वारे यामुळे सध्यातरी पावसाची शक्यता नसल्याने उगवलेली पिके आणखी किती दिवस तग धरणार अशा विवंचनेत शेतकरी वर्ग आकाशाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र जिरायती भागात दिसत आहे. या भागातील मजूरवर्ग बागायती भागाकडे स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहे. ऐन पावसाळ्यात परीसरातील ओढे, नाले, पाझर तलाव कोरडेच आहेत. (वार्ताहर)