शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनांची सोडा साथ कॅन्सरवर करा मात

By admin | Updated: February 2, 2015 23:24 IST

कॅन्सर! असे नुसते म्हटले तरी धडकी भरते. पण, प्रत्यक्ष परिस्थिती उद्भवल्यावर त्याचा सामना करण्याशिवाय पर्याय नसतो.

कॅन्सर! असे नुसते म्हटले तरी धडकी भरते. पण, प्रत्यक्ष परिस्थिती उद्भवल्यावर त्याचा सामना करण्याशिवाय पर्याय नसतो. या आजाराची पूर्ण माहिती आणि उपचार घेत असतानाच मानसिक अवस्था जपणेही तितकेच महत्त्वाचे असते. उद्या ४ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या जागतिक कॅन्सर दिनानिमित्त...न्सर हा एकच आजार नसून, त्याचे शेकडो प्रकार आहेत. पण सर्वच कॅन्सरच्या गाठींची सुरुवात एका पेशीपासूनच होते. शरीराचा प्रत्येक अवयव पेशींपासून बनलेला असतो आणि त्यांची वाढ नियंत्रितरीतीने होत असते. कधीकधी काही कारणांनी हे नियंत्रण सुटते आणि या पेशी अनिर्बंधपणे, बेशिस्तपणे वाढू लागतात. आणि इथेच कॅन्सरची सुरुवात होते. या अनिर्बंध वाढलेल्या पेशी इतरत्र पसरू लागतात आणि तेथील अवयवांच्या कार्यात बाधा आणतात. कॅन्सर होण्याचे निश्चित असे कारण सांगता येणे अवघड आहे. व्यसनाधीनता हे कॅन्सरचे सगळ्यात महत्त्वाचे आणि टाळता येण्यासारखे कारण आहे. वाढते वयदेखील कॅन्सरचे महत्त्वाचे कारण आहे. अनुवंशिकता, बदलती जीवनशैली, स्थूलपणा, हॉर्मोन्सचे वाढते असंतुलन, काही विषारी रसायने, प्रदूषण ही कॅन्सरची आणखी काही महत्त्वाची कारणे आहेत. कॅन्सरच्या निदानासाठी त्या गाठीचा तुकडा किंवा सुईद्वारे गाठीतील रक्त काढून तपासले जाते, यावरून कॅन्सरचा नेमका प्रकार कोणता, हे तपासले जाते. याशिवाय एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पेटस्कॅन यांसारख्या तपासण्यांद्वारे कॅन्सरची व्याप्ती समजू शकते. कॅन्सरवरील उपचार ठरविण्यासाठी आजाराची व्याप्ती माहीत असणे गरजेचे असते. एकाच जागी असलेल्या आजाराला शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकता येते किंवा तिच्यावर रेडीओथेरपीद्वारे क्ष-किरणांचा मारा करता येतो. सर्वत्र पसरलेल्या आजाराला किमोथेरपीचे उपचार करावे लागतात. कॅन्सरच्या निदानाने घाबरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. आज सर्व प्रकारच्या कॅन्सरवर प्रभावी असे उपचार उपलब्ध आहेत. अशा वेळी कुटुंबातील इतर लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरतो. रुग्णाला धीर देऊन त्याचे मनोधैर्य वाढविल्यास रुग्ण उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देतो. औषधांबरोबरच उत्तम आहार आणि जमेल तसा व्यायाम गरजेचा आहे. कॅन्सरचे उपचार दीर्घकाळ चालणारे असतात. त्यामुळे रुग्ण कधी कंटाळतात तर कधी खचून जातात. अशा वेळी कुटुंबीय किंवा मित्र-मंडळींनी आधार दिल्यास रुग्ण उपचार पूर्ण करूशकतो आणि कॅन्सरवर मात करण्यात यशस्वी होतो. उपचार अर्धवट सोडून देणे, उपचारात दिरंगाई करणे किंवा अयोग्य पद्धतीने उपचार करून घेणे प्रकृतीला अपायकारक ठरू शकते. त्यामुळे या रोगाशी सामना करावा लागू नये यासाठी प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये व्यसनांपासून दूर राहणे, भाज्या व फळेयुक्त समतोल आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि वेळोवेळी शरीराच्या तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. सर्व सुरळीतपणे सुरू असतानाही कॅन्सरच्या स्क्रीनिंग टेस्ट केल्या जातात. ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयमुखाचा कॅन्सर, मोठ्या आतड्याचा कॅन्सर आणि प्रोटेस्ट ग्रंथींचा कॅन्सर यामध्ये चाचण्या वेळीच होणे गरजेचे आहे. लवकर निदान झाल्याने प्राथमिक अवस्थेतच उपचार होतात आणि रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कॅन्सरच्या तपासण्यांबाबत दक्ष राहावे. लेखक कर्करोगतज्ज्ञ (डी.एम.) आहेत.डॉ. चेतन देशमुख