‘टास्क’मध्ये थोडा नफा दिला मग ३७ लाखांचा गंडा घातला; फसवणुकीचा गुन्हा दाखल

By भाग्यश्री गिलडा | Published: May 6, 2024 06:04 PM2024-05-06T18:04:59+5:302024-05-06T18:06:28+5:30

टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधून टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले गेले...

Gave a little profit in 'Task' then put 37 lakhs of money; Fraud case registered | ‘टास्क’मध्ये थोडा नफा दिला मग ३७ लाखांचा गंडा घातला; फसवणुकीचा गुन्हा दाखल

‘टास्क’मध्ये थोडा नफा दिला मग ३७ लाखांचा गंडा घातला; फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : ऑनलाइन वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी रविवारी (दि. ५) पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदविण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भेकरे नगर परिसरात राहणाऱ्या विवेकानंद प्रसाद वय- ३७) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधून टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले गेले. त्यानंतर, वेगवेगळे टास्क देऊन आणखी पैसे मिळविण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला टास्कच्या बदल्यात नफा देऊन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, अधिक नफा मिळणार, असे आमिष दाखवून ३७ लाख २७ हजार रुपये भरण्यास भाग पाडले.

काही कालावधीनंतर मोबदला मिळणे बंद झाल्याने विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही आणि तक्रारदार यांना ग्रुपमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे तक्रारदार यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मोढवे हे करत आहेत.

Web Title: Gave a little profit in 'Task' then put 37 lakhs of money; Fraud case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.