Pune Book Festival : पुणे बूक महोत्सवात आज गौतमी पाटील येणार..!
By श्रीकिशन काळे | Updated: December 21, 2024 14:07 IST2024-12-21T14:05:50+5:302024-12-21T14:07:27+5:30
ज्या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम असतो, तिथे प्रचंड गर्दी होते.

Pune Book Festival : पुणे बूक महोत्सवात आज गौतमी पाटील येणार..!
पुणे : आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटीलपुणे बूक महोत्सवात सहभागी होत आहे. या महोत्सवात ती सहभागी होणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, ती महोतसवात नृत्य नाही तर पुस्तक वाचणार आहे. पण ती महोत्सवात आपली अदाकारी दाखवेल का ? अशीही उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
गेल्या आठवड्यापासून पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातील मैदानावर पुणे बुक महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाला दररोज प्रचंड गर्दी होत असून, आज शनिवारी (दि.२१) असल्याने पुणेकर आवर्जुन हजेरी लावतील, अशी आशा आहे. या महोत्सवात आज गौतमी पाटील उपस्थिती लावणार आहे. आज दुपारी दोन नंतर गौतमी पाटील पुस्तक महोत्सवात नाचणार नाही, तर पुस्तक वाचणार आहे.
ज्या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम असतो, तिथे प्रचंड गर्दी होते. त्यामुळे पुणे बुक महोत्सवात तिचा कार्यक्रम असल्याचे जाहीर केले नव्हते. पण ऐनवेळी हा कार्यक्रम होत असून, तिचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ती एक पुस्तक देखील वाचणार आहे. गौतमी पाटीलच्या उपस्थितीमुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. पोलिसांना व आयोजकांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार आहेत. गौतमी पाटील महोत्सवाला भेट देणार असल्याने त्याची एकच चर्चा सुरू आहे.