- जयवंत गंधालेलोकमत न्यूज नेटवर्कहडपसर (पुणे) : येथील चिंतामणी राऊत हा गतिमंद विशेष मुलगा. त्याने स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हावे, ही त्याच्या वडिलांची तीव्र इच्छा. त्याच्या शारीरिक ठेवणीचा आणि भविष्याचा विचार करून त्याने वेटलिफ्टिंगमध्ये भवितव्य घडविण्याचा मनोदय निश्चित केला आहे. आजघडीला राऊत कुटुंब त्याला घडविण्यात गुंतले असून, चिंतामणीने ऑलिम्पिकमध्ये कामगिरी करावी, असा निर्धार केला आहे.
चिंतामणीचे वडील बाळासाहेब राऊत यांनी व्यस्त व्यावसायिक जीवनातून वेळ काढून चिंतामणीला घडविण्याचे ठाम ध्येय ठेवले. त्यांच्या इच्छेला पत्नी रूपाली, मुली कादंबरी व ऋतुजा यांनीही खंबीर साथ दिली.
७व्या वर्षांपासून प्रयत्न सुरूचिंतामणीला सातव्या वर्षांपासून घडविण्यासाठी कुटुंबीयांनी प्रयत्न सुरू केले. जोरबैठका, धावणे, उड्या मारणे आदी शिकण्यासाठी दोन वर्षे खर्ची घातली. आई-वडिलांसह बहिणींनीही परिश्रम घेतले. राजहंस मेहंदळे यांच्याकडे चिंतामणीने प्रशिक्षण घेतले. ‘पॉवरलिफ्टिंग’चे राज्य सचिव संजय सरदेसाई, सहायक सचिव रवींद्र यादव यांचे मार्गदर्शन मिळाले. चिंतामणीला पाँडिचेरीला प्रशिक्षण देण्याचे ठरविले. वर्षभरापासून राऊत कुटुंब त्याच्यासोबत प्रशिक्षणासाठी पाँडिचेरी मुक्कामी आहे.
झारखंड येथे राष्ट्रीय स्पर्धेत चिंतामणी ९३ किलो वजन गटात खेळला. ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या याच गटातील खेळाडूचे रेकॉर्ड त्याने मोडले. याच जोरावर चिंतामणी ऑलिम्पिकमध्ये यश मिळवेल, असा विश्वास आहे.
बाळासाहेब राऊत, चिंतामणीचे वडीलराष्ट्रीय स्पर्धेतील सरावाने त्याची सुरुवात झाली. ऑलिम्पिकमध्येही विशेष म्हणूनच नव्हे, तर खुल्या गटात तो कसा खेळेल, यासाठीही प्रयत्न आहे. रूपाली राऊत, चिंतामणीची आई