शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभला रिअ‍ॅक्टरच्या स्फोटामुळे गॅसगळती

By admin | Updated: February 14, 2015 22:54 IST

येथील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या ‘आर्थोकेम’ कंपनीमध्ये रिअ‍ॅक्टरच्या स्फोटामुळे गॅसगळती झाली. यामध्ये एक कामगार जखमी झाला,

कुरकुंभ : येथील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या ‘आर्थोकेम’ कंपनीमध्ये रिअ‍ॅक्टरच्या स्फोटामुळे गॅसगळती झाली. यामध्ये एक कामगार जखमी झाला, तर काही कामगारांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेत सिद्धेश्वर रणदिवे (वय ३५, सध्या रा. कुरकुंभ) हा कामगार जखमी झाला आहे. दरम्यान शनिवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास येथील आर्थोकेम कंपनीमध्ये फॅब्रिकेशनचे काम सुरू होते. या वेळी उत्पादनाची चाचणी चालू असताना रिअ‍ॅक्टरमधील वायू बाहेर पडण्याची व्यवस्था नसल्यामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कंपनीमध्ये काही प्रकारच्या रसायनांचे ट्रेडिंग केले जाते; मात्र ट्रेडिंगसाठी आणलेल्या रसायनचा वापर करून बेकायदेशीररीत्या त्यावर चाचणी कंपनीत करीत असल्याचे बोलले जात आहे. ही घटना घडल्यानंतर कामगार रणदिवे याने वेळीच पळ काढल्याने तो वाचला; पण यामध्ये तो जखमी झाला आहे. या कंपनीमधील ही दुसरी घटना असून, त्याआधीदेखील या कंपनीत स्फोट होऊन कामगार गंभीर जखमी झाल्याने कायमचे अंपगत्व आलेले आहे. अशातच कंपनीची शासनाच्या नियमाप्रमाणे परवानगी रद्द व्हावी, यासाठी तक्रार अर्ज पुणे फॅक्टरी इन्सपेक्टरकडे देण्यात आली आहे. या स्फोटांमुळे औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)कंपनीच्या गेटवर नामफलकच नाहीआर्थोकेम या कंपनीच्या गेटवर नामफलकदेखील नसून, अग्निशामक दल अथवा आपत्ती व्यवस्थापनाने या कंपनीपर्यंत कसे पोहोचायचे, हादेखील एक मोठा प्रश्न आहे. या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.