शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
4
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
5
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
6
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
7
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
8
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
9
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
10
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
11
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
12
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
13
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
14
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
15
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
17
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
18
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
19
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
20
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गॅसटंचाईचा कल्लोळ; चुलीवर स्वयंपाकाची वेळ, हॉटेलवाल्यांची तारांबळ, प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा

By अजित घस्ते | Updated: March 13, 2026 05:51 IST

कोळशाची माेठ्या प्रमाणात मागणी

अजित घस्ते
लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात घरगुती, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फटका हॉटेल व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना बसत असून, पर्यायी इंधन म्हणून आता लाकूड आणि कोळशाकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. 
    
वाढत्या मागणीमुळे या साहित्यात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. महागाईत जगायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. पुन्हा एकदा ‘चूल आणि बोळके’ असे चित्र पाहायला मिळत असून, प्रशासनाने गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

व्यावसायिक अडचणीत 

हॉटेल व्यावसायिक अडचणीत असल्याने काळ्या बाजाराने मिळणारा ५ हजारांचा गॅस सिलिंडरही मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. आजही व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून घरगुती गॅसचा छुपा वापर केला जात होता.

बाहेरील जेवणावर भिस्त

‘गॅस  बुक करूनही सिलिंडर मिळत नाही. घरामध्ये स्वयंपाक कसा करायचा? हा प्रश्न आहे. नाईलाजास्तव बाहेरून जेवण मागवावे लागते किंवा लाकडावर पाणी तापवावे लागत आहे,’ अशी व्यथा गृहिणींनी मांडली.

हॉटेलधारक धास्तावले, कामगारवर्गात चिंता 

संगमनेर : संगमनेर शहर आणि तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांना व्यवसाय बंद होण्याची भीती वाटू लागली आहे. सध्याची परिस्थिती कोरोना संकटाची आठवण करून देणारी वाटत असल्याचे व्यावसायिकांकडून बोलले जात आहे. गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असणारे शेकडो कामगार आणि स्थानिक बाजारपेठ धोक्यात आली आहे. संगमनेर शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक उपाहारगृह आणि हॉटेल बंद करावी लागतील काय?, अशी भीती व्यावसायिकांमधून व्यक्त हाेत आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचा साठा पुरेसा असून नियमित गॅस टाक्या घेऊन वाहने येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये. त्यांना टाक्या नियमित मिळतील असे निर्देश गॅस एजन्सीजना दिले आहेत. 
रसिक सातपुते, पुरवठा अधिकारी

एलपीजी निर्यातीवर कोर्टाची नाराजी

नागपूर : अमेरिका-इराण युद्धामुळे देशातील नागरिक एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याला तोंड देत आहेत. असे असताना कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनी एलपीजी निर्यातीवर भर देत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली.

अनेक मेन्यूवर कपात

उपहागृह, हॉटेलमध्ये पदार्थांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. जेथे अनेक पदार्थ मिळायचे तेथे आता अगदीच बोटावर मोजता येतील इतकेच पदार्थ तयार केले जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra faces gas shortage, affecting homes and businesses.

Web Summary : Maharashtra is grappling with a gas cylinder shortage, impacting households and businesses. Residents are turning to wood and coal, increasing prices. Hotels face closure, and workers fear job losses. The administration claims the situation is under control, urging people to avoid rumors.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाई