लोणी काळभोरमध्ये अटक केलेल्या गांजा तस्करांचे कनेक्शन नंदुरबारपर्यंत; २२ लाखांचा गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:54 IST2026-02-24T11:54:31+5:302026-02-24T11:54:43+5:30

या प्रकरणी विक्रीसाठी गांजा पुरवठा करणाऱ्या दोघा सराईतांना गुन्हे शाखेच्या अमली विरोधी पथक एकने अटक केली आहे

Ganja smugglers arrested in Loni Kalbhor have connections up to Nandurbar; Ganja worth 22 lakhs seized | लोणी काळभोरमध्ये अटक केलेल्या गांजा तस्करांचे कनेक्शन नंदुरबारपर्यंत; २२ लाखांचा गांजा जप्त

लोणी काळभोरमध्ये अटक केलेल्या गांजा तस्करांचे कनेक्शन नंदुरबारपर्यंत; २२ लाखांचा गांजा जप्त

पुणे : लोणी काळभोर परिसरात अटक केलेल्या गांजा तस्करांचे कनेक्शन थेट नंदुरबारपर्यत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी विक्रीसाठी गांजा पुरवठा करणाऱ्या दोघा सराईतांना गुन्हे शाखेच्या अमली विरोधी पथक एकने अटक केली आहे.

मंगेश जाण्या पावरा (वय २९ रा. भोगावडे खुर्द, धडगाव नंदुरबार) व ज्ञानेश्वर मगन पावरा (वय २५ रा. सांगवी, शिरपूर, धुळे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आतापर्यंत या प्रकरणी चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल २२ लाखांचा ४३ किलो गांजा यासह दोन मोटारी, ५ मोबाइल असा ऐवजही जप्त केला आहे.

लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्तीनजीक गांजाची तस्करी करणारे अक्षय पोपटराव पाडुळे (वय ३१, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) आणि विशाल जाधव (वय २८ रा. हिंगणे मळा, हडपसर) यांना पोलिसांनी १४ फेब्रुवारीला अटक केली होती. त्यांच्याकडून ६ लाख ८८ हजारांचा ३५ किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणी आरोपींविरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. संबंधित गुन्हा अमलीपदार्थ विरोधी पथक एककडे वर्ग करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पथकाने नंदुरबार परिसरातील डोंगरदऱ्यातून सराईत गांजातस्कर आरोपी मंगेश पावरा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपासानंतर दुसरा आरोपी ज्ञानेश्वर पावरा याला नवी सांगवी, शिरपूर (जि.धुळे) परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त पिंगळे, एसीपी शंकर खटके, वरिष्ठ निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, विठ्ठल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, नीलेश जाधव, विजय कांबळे, मंगेश गुंड, कदम, अक्षय शिर्के, शेलार यांनी केली.

 

Web Title : लोणी काळभोर में गांजा तस्कर नंदुरबार से जुड़े, गिरफ्तार

Web Summary : लोणी काळभोर में गिरफ्तार गांजा तस्करों का संबंध नंदुरबार से है। पुलिस ने 22 लाख रुपये का गांजा, दो कारें और मोबाइल जब्त किए। मामले में चार लोगों को गिरफ्तार किया गया है। आगे की कड़ियों का पता लगाने के लिए जांच जारी है।

Web Title : Ganja Smugglers Arrested in Loni Kalbhor Linked to Nandurbar

Web Summary : Ganja smugglers arrested in Loni Kalbhor are linked to Nandurbar. Police seized ₹22 lakhs worth of ganja, two cars, and mobiles. Four people have been arrested in this case. The investigation is ongoing to uncover further connections and details.