शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

धूर फवारणीस नागरिकांचा विरोध

By admin | Updated: September 4, 2015 02:18 IST

नागरी वस्तीमध्ये डास व कीटकांचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कीटक निर्मूलन शाखेतर्फे बिबवेवाडी परिसरात मशिनद्वारे धुराची फवारणी करण्यात आली

कात्रज : नागरी वस्तीमध्ये डास व कीटकांचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कीटक निर्मूलन शाखेतर्फे बिबवेवाडी परिसरात मशिनद्वारे धुराची फवारणी करण्यात आली. मात्र, या फवारणीने श्वसनाला त्रास होतो व आरोग्याला तो धोकादायक असल्याचे कारण सांगून नागरिक याला विरोध करीत आहेत. त्यामुळे या विभागाचे कर्मचारी हैराण झाले आहेत. मुळातच महापालीकडे संपूर्ण शहरासाठी केवळ तीनच धुरफवारणी यंत्रे आहेत. प्रत्येक विभागाला एक दिवस, अशा रीतीने ही यंत्रे काम करीत आहेत. त्यामुळे या विभागाच्या कर्मचाऱ्यांना अगोदरच खूप ताण असतो. अध्ये-मध्ये ही फवारणी यंत्रे बंद पडतात. त्यांच्या दुरुस्तीसाठी मेंटेनन्स करणारा येईपर्यंत थांबावे लागते. त्यातच अनेक नागरिक, सामाजिक संस्था या धूरफवारणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशा अफवा पसरवून या कर्मचाऱ्यांना विरोध करतात. त्यामुळे त्यांना काम करणे मुश्कील बनले आहे. काही गृहनिर्माण संस्था या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवेश देत नाहीत; त्यामुळे या कर्मचाऱ्यांना काम करण्यास अडथळे निर्माण होतात. डासांमुळे होणारे मलेरिया, डेंगीसारखे रोग होऊ नयेत म्हणून उपाययोजना करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच नागरिक अपशब्द वापरतात. प्रसंगी हाकलूनही देतात. तेव्हा हे कर्मचारी निमूटपणे दुसऱ्या भागात काम करतात, असे दिसून आले आहे. तसेच, पालिका नियमावलीनुसार ज्या घरात, घराच्या आसपास डासांची पैदास होण्यासारखी स्थिती असेल, त्या घरमालकाला ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड करण्याचा अधिकार पालिका कर्मचाऱ्यांना आहे. अशा घरमालकांवर कारवाई करीत असताना ते नागरिक स्थानिक नगरसेवकांना फोन करून या कर्मचाऱ्यांवर दबाव आणतात आणि दंड भरण्यास नकार देतात. तसेच, या कर्मचाऱ्यांना धूरफवारणी करताना तोंडाला मास्क व हँडग्लोव्ह्ज पुरवले जात नाहीत; त्यामुळे या धोक्यामध्ये राहून काम करावे लागते, अशी तक्रार पालिकेचे मलेरिया सर्व्हेे निरीक्षक रोहन चव्हाण यांनी लोकमतला सांगितली. या धूरफवारणी यंत्रासाठी शासनातर्फे पायरेथम नावाचे औषध पुरवले जाते, तसेच साठलेल्या पाण्यावर फवारणीसाठी टेमीफॉस हे औषध पुरवले जाते. यांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शाकतो; त्यामुळे त्यावर बंदी घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले तरी ही धूरफवारणी व औषधफवारणी सुरू आहे. (वार्ताहर)