पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत दगडफेक

By Admin | Updated: April 2, 2015 05:54 IST2015-04-02T05:54:14+5:302015-04-02T05:54:14+5:30

सस्तेवाडी (ता. बारामती) गावात झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोरच

In front of the police station, there are two gang racket | पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत दगडफेक

पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत दगडफेक

वडगाव निंबाळकर : सस्तेवाडी (ता. बारामती) गावात झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोरच जोरदार मारामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत तिघे जण जखमी झाले.
या घटनेची रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल नव्हती. या दोन्ही गटाने आपसात भांडण मिटविल्याची चर्चा या ठिकाणी होती.
येथील एका गटाने दुसऱ्या गटातील कुटुंबियांना मारहाण केली. त्यावरून तक्रार देण्यासाठी बुधवारी (दि. १) पोलीस ठाण्यासमोर हे दोन गट एकत्रित आले. मात्र, या ठिकाणी देखील पोलीस स्टेशनसमोरच दोन गटांमध्ये मारामारी झाली. मारामारीचे रुपांतर दगडफेकीत झाले. या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. पोलीस अधिकारी, कर्मचारी पोलीस ठाण्याच्या बाहेर आल्यानंतर दोन्ही गट पळून गेले. रात्री उशिरा पर्यंत एकाही गटाने या प्रकरणी तक्रार दिली नव्हती. या गटांनी आपसात भांडणे मिटविल्याची चर्चा होती. ग्रामपंचायतीच्या जुन्या वादावरून हा प्रकार झाल्याचे समजते. (वर्ताहर)

Web Title: In front of the police station, there are two gang racket