मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार; बहिण-भावावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 10:39 AM2023-01-27T10:39:26+5:302023-01-27T10:39:50+5:30

बलात्कार केल्यानंतर पैशाची मागणी करून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली

friend wife by threatening to kidnap the child A case has been filed against the brother and sister | मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार; बहिण-भावावर गुन्हा दाखल

मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार; बहिण-भावावर गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे/किरण शिंदे : मित्राच्या पत्नीला तोंडावर ऍसिड टाकून चेहरा विद्रूप करण्याची आणि मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बलात्कार केल्यानंतर पैशाची मागणी करून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. एका 39 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार भाऊ आणि बहिणी विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

साजिद मोहम्मद अली कुंजू (वय 39) आणि हसीना अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील साजिद याला अटक करण्यात आली आहे. आरोपी साजिद हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र आहे. 2021 पासून वारंवार हा प्रकार घडत होता. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र असल्याने दोघांची ओळख होती. आरोपीने फिर्यादी महिला मोबाईलवर फोन करत तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत मैत्री कर, शारीरिक संबंध ठेव, जर नकार दिला तर मी तुझे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पाठवीन अशी धमकी दिली होती. 

आरोपीने फिर्यादी महिलेला ठार मारण्याची ही धमकी दिली होती. तुझ्या तोंडावर ऍसिड टाकेल व तुझा चेहरा विद्रूप करेल. मुलाला किडनॅप करेल अशी धमकी देऊन आरोपीने फिर्यादीला जबरदस्तीने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवले. या सर्व प्रकारानंतर आरोपीने फिर्यादीला वारंवार फोन करून पैशाची मागणी केली. तर आरोपीची बहीण असलेल्या दुसऱ्या आरोपीने भावासोबत लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: friend wife by threatening to kidnap the child A case has been filed against the brother and sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.