शिवभोजन थाळी इथून पुढंही मोफतच मिळणार; शासन निर्णयात बदल नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 08:50 PM2021-09-14T20:50:41+5:302021-09-14T22:03:06+5:30

कोरोनाच्या संसर्गामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधाच्या काळात गरजूंना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत होती.

'Free' Shivbhojan Thali started by Mahavikas Aghadi government closed; Now you have to pay 10 rupees | शिवभोजन थाळी इथून पुढंही मोफतच मिळणार; शासन निर्णयात बदल नाही

शिवभोजन थाळी इथून पुढंही मोफतच मिळणार; शासन निर्णयात बदल नाही

Next
ठळक मुद्देपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत मिळून ११ ठिकाणी ही थाळी उपलब्ध

पुणे : कोरोना महामारीच्या काळात निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले होते. राज्य शासनाने गरजूंसाठी मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला होता. मागील अनेक महिन्यांपासून याचा अनेक गरजू लाभ घेत होते. मात्र १५ सप्टेंबरपासून ही मोफत शिवभोजन थाळी बंद होणार होती. पण शासनाने निर्णयात कोणताही बदल केलेला नसून यापुढेही थाळी सर्वाना मोफत मिळणार आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधाच्या काळात गरजूंना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत होती. मात्र, आता या थाळीसाठी नागरिकांना दहा रुपये शुल्क भरावे लागणार होते. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत मिळून ११ ठिकाणी ही थाळी उपलब्ध करून दिली होती. वाढता प्रतिसाद लक्षात घेता दोन्ही ठिकाणी सध्या ३७ केंद्रे आहेत. या माध्यमातून दररोज ६ हजार ३८ जणांना या योजनेंतर्गत भोजन देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती.

Web Title: 'Free' Shivbhojan Thali started by Mahavikas Aghadi government closed; Now you have to pay 10 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app