Free PMP bus service for essential service personnel in Pune city | पुणे शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीची बससेवा मोफत

पुणे शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीची बससेवा मोफत

पुणे : शहरात अत्यावश्यक सेवा वगळून सर्व वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार असून ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
‘पीएमपी’कडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी २० बसद्वारे सेवा सुरू ठेवली जाणार आहे. त्यासाठी सहा मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ८.३० ते १०.३० आणि सायंकाळी ४.३० ते रात्री ६.३० यावेळेत ३० मिनिटे वारंवारिता व इतर वेळेत ६० मिनिटे वारंवारिता असेल. 
---------------------
पीएमपीचे मार्ग पुढीलप्रमाणे -
मार्ग १ कात्रज ते कात्रज - कात्रज, बालाजीनगर, स्वारगेट, बाजीराव रोड, मनपा, सिमला आॅफिस, आरटीओ, नायडू हॉस्पीटल, पुणे स्टेशने डेपो, जिल्हाधिकारी कार्यालय, गाडीतळ, शनिवारवाडा, मंडई, स्वारगेट, कात्रज.
मार्ग २ औंध ते डेक्कन - औंध, आयटीआय, बाणेर फाटा , पुणे विद्यापीठ, म्हसोबा गेट, शिवाजीनगर, शिवाजी पुतळा, मनपा, डेक्कन, जंगली महाराज रस्ता, मनपा, सिमला ऑफीस, पुणे विद्यापीठ, आयटीआय औंध. 
मार्ग ३ विमाननगर ते मनपा - विमाननगर, नगररोड, येरवडा, बंडगार्डन, वाडिया कॉलेज, नायडू हॉस्पीटल, आरटीओ, जुना बाजार, मनपा (याचमार्गे परत).
मार्ग ४ भेकराईनगर ते मनपा - भेकराईनगर, हडपसर, वैदुवाडी, फातिमानगर, पुलगेट, सेव्हन लव्हज चौक, रामोशी गेट, पॉवर हाऊस, एम्प्लॉयमेंट ऑफिस, जीपीओ, जिल्हाधिकारी कार्यालय, गाडीतळ, मनपा (याचमार्गे परत).
मार्ग ५ विश्रांतवाडी ते मनपा - विश्रांतवाडी, डेक्कन कॉलेज, संगमवाडी, बीआरटी रोड, सिमला आॅफ, मनपा, वाकडेवाडी, खडकी स्टेशन, बोपोडी, खडकी बाजार, होळकर पुल, डेक्कन कॉलेज, फुलेनगर, विश्रांतवाडी.
मार्ग ६ नांदेड सिटी ते डेक्कन - नांदेड सिटी, धायरी फाटा, आनंदनगर, राजाराम पुल, कमिन्स कॉलेज, कर्वेनगर, कोथरुड स्टॅन्ड, पौड फाटा, कर्वे रोड, डेक्कन (याचमार्गे परत)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Free PMP bus service for essential service personnel in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.