शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

केवायसी अपडेटच्या नावाखाली पेटीएमवापरकर्त्यांची फसवणुक ;सायबर पोलिसांचा सावधानेतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 12:28 PM

अ‍ॅप डाऊनलोड केल्यास आपल्या मोबाईलचा किंवा कॅम्प्युटरचा अ‍ॅक्सेस समोरील व्यक्तीकडे जात असून त्यावरुन मोठ्या प्रमाणावर फसवणुक होत आहे. असे मेसेज अथवा फोन आल्यास व कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करु नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

पुणे : सायबर चोरटे पेटीएम अकाऊंटचे व्हेरिफिकेशन व केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने पेटीएम वापरकर्त्यांना फोन करतात व त्यांच्याकडून बँक अकाऊंटची व डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डची माहिती विचारत आहेत. त्यांना टीम व्हयुवर किंवा एनिडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगतात. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यास आपल्या मोबाईलचा किंवा कॅम्प्युटरचा अ‍ॅक्सेस समोरील व्यक्तीकडे जात असून त्यावरुन मोठ्या प्रमाणावर फसवणुक होत आहे. असे मेसेज अथवा फोन आल्यास व कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करु नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले की, नागरिकांचे मोबाईलवर नोटीफिकेशनचे एसएसएस द्वारे काही बँक मेसेज येतात. त्यामध्ये तुमच्या खात्यावरुन काही ठराविक रक्कम वजा झाली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा असा मजकूर असतो आणि त्याखाली मोबाईल नंबर दिलेला असतो़. नागरिकांनी अशा प्रकारच्या मेसेजला कोणत्याही प्रकारे घाबरुन न जाता पुन्हा उत्तर देऊ नये किंवा त्यातील लिंक शेअर करु नये़ फोनद्वारे व अशा लिंकद्वारे आपल्या फोनचा अ‍ॅक्सेस त्यांचे ताब्यात जातो. तुमच्या खात्यावरील पैसे कमी झाल्याचे फोन येत आहेत, असे गेल्या चार ते पाच दिवसात निदर्शनास येत आहे. नागरिकांनी अशा मेसेजला उत्तर देऊ नये अथवा त्यांनी पाठविलेल्या लिंक ओपन करु नये. 

अ‍ॅप अथवा लिंक ओपन केल्यास आपल्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस सायबर चोरट्याकडे जातो़ व आपल्या फोनमध्ये येणारे ओटीपी, मेसेज, आपले बँकेचे ऑनलाईन अ‍ॅप, पेटीएम, गुगल पे यासारखे सर्व अ‍ॅप चे अ‍ॅक्सेस त्याच्याकडे जातो़ व ते सहजासहजी आपल्या अकाऊंटमधील रक्कम ते काढून घेतात व आपल्यास तात्काळ काही कारवाई करता येऊ नये म्हणून आपल्याला आलेले मेसेजसुद्धा ते डिलिट करतात. सद्यस्थितीत सगळीकडे पेटीएमकडून बोलतो आहे आणि आपली केवायसी अपडेट करायची आहे, असे सांगून लोकांकडून त्यांची माहिती न कळत घेऊन पैसे काढून घ्यायचे अशा प्रकारचा ट्रेंड मागील चार पाच दिवसात दिसून आला आहे. नागरिकांनी अशा प्रकारचे एसएमएस अथवा कॉल आले तर ते घेऊ नयेत अथवा आपल्याबाबतची आणि बँकेची माहिती देऊ नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केले आहे.

टॅग्स :Paytmपे-टीएमcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस