पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझेंच्या पुतण्यांची घरं फोडून शंभर तोळे सोन्यासहित तीन ते चार लाखांचा ऐवज चोरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 10:44 IST2021-09-06T10:44:03+5:302021-09-06T10:44:10+5:30

मोझे व त्यांचे भाऊ मोहन मोझे हे त्यांच्या घराला कुलूप लावून गेले होते बाहेरगावी

Former Pune MLA Rambhau Moze's nephews' houses burglarized and Rs 53 lakh stolen | पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझेंच्या पुतण्यांची घरं फोडून शंभर तोळे सोन्यासहित तीन ते चार लाखांचा ऐवज चोरला

पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझेंच्या पुतण्यांची घरं फोडून शंभर तोळे सोन्यासहित तीन ते चार लाखांचा ऐवज चोरला

ठळक मुद्देकपाटातील लॉकर उचकटून पैसे, सोन्याचांदीच्या दागिन्यांबरोबरच, किंमती घड्याळही केलं लंपास

पुणे : माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे पुतणे हरीश्चंद्र मोझे व मोहन मोझे यांच्या घरं फोडून चोरट्यांनी तब्बल ५३ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

याप्रकरणी हरीश्चंद्र ऊर्फ राजू मनोहर मोझे (वय ४९, रा. राम मंदिराजवळ, संगमवाडी, येरवडा) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

मोझे व त्यांचे भाऊ मोहन मोझे हे त्यांच्या घराला कुलूप लावून ३ सप्टेंबर रोजी बाहेरगावी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी घराचे दरवाजांची कुलूपे तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममधील कपाटातील लॉकर उचकटून त्यांत ठेवलेले ४० लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे, चांदीचे दागिने, किंमती घड्याळे चोरुन नेली. तसेच मोहन मनोहर मोझे यांच्या घरात घरफोडी करुन सोन्याचे दागिने, किंमती घड्याळे, रोख रक्कम असा १३ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

मोझे कुटुंबिय रविवारी सायंकाळी घरी परतले. तेव्हा घरफोडी झाल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्यांच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक समीर करपे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Former Pune MLA Rambhau Moze's nephews' houses burglarized and Rs 53 lakh stolen