दि सेवा विकास बँकेचा माजी चेअरमन अमर मूलचंदानीला न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 20:54 IST2023-01-30T20:53:51+5:302023-01-30T20:54:02+5:30

सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने शुक्रवारी सकाळी साडेसहाला अमर मूलचंदानी याच्या घरावर छापा मारला

Former Chairman of The Sewa Development Bank Amar Moolchandani in judicial custody | दि सेवा विकास बँकेचा माजी चेअरमन अमर मूलचंदानीला न्यायालयीन कोठडी

दि सेवा विकास बँकेचा माजी चेअरमन अमर मूलचंदानीला न्यायालयीन कोठडी

पिंपरी : दि सेवा विकास बँकेचा माजी चेअरमन अमर मूलचंदानी याच्या घरावर सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या पथकाने शुक्रवारी (दि. २७) छापा मारला. यावेळी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, अमर मूलचंदानी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अमर मूलचंदानी याला अटक करून सोमवारी  (दि. ३०)  न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिासांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी अन्य पाच जणांना रविवारी (दि. २९) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली.

सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने शुक्रवारी सकाळी साडेसहाला अमर मूलचंदानी याच्या घरावर छापा मारला. बराच वेळ दरवाजा ठोठावून देखील दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडण्यास सुरवात केली. त्यानंतर दरवाजा उघडला. ईडीचे अधिकारी घरात आल्यानंतर बराच वेळ अमर मूलचंदानी एका खोलीत लपून होता. मात्र, त्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने तो दरवाजा तोडण्याची तयारी केली. त्यानंतर चावीने हा दरवाजा उघडण्यात आला. त्यानंतर ‘इडी’च्या पथकाने अमर मूलचंदानीला ताब्यात घेतले. दरम्यान, अमर मूलचंदानी याने मोबाइलमधील पुरावे नष्ट केले, असे फिर्यादीत नमूद आहे. ईडीने ताब्यात घेताच काही वेळाने अमर मूलचंदानी याने छातीत दुखत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. 

Web Title: Former Chairman of The Sewa Development Bank Amar Moolchandani in judicial custody