'मुलींना I Love You मेसेज पाठवून जबरदस्तीने..., शिक्षकाकडून अश्लील कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 14:39 IST2023-01-29T14:38:08+5:302023-01-29T14:39:55+5:30
शाळेत घेण्यात आलेल्या गुड टच, बॅड टच कार्यक्रमादरम्यान हा प्रकार उघड

'मुलींना I Love You मेसेज पाठवून जबरदस्तीने..., शिक्षकाकडून अश्लील कृत्य
पुणे : शाळेतील अल्पवयीन मुलींना व्हॉट्सॲपवर ‘आय लव्ह यू’ असा मेसेज पाठवून जबरदस्तीने कीस घेणाऱ्या क्रीडा शिक्षकाला कोंढवा पोलिसांनीअटक केली आहे. दरम्यान, शाळेत झालेल्या गुड टच, बॅड टच कार्यक्रमात समुपदेशक महिलेकडे पीडितेने केलेल्या तक्रारीतून हा प्रकार उघड झाला.
अविशान गोविंद चिलवेरी (वय २३, रा. येरवडा) असे या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका समुपदेशक महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील एका शाळेत नोव्हेंबर २०२२ ते २४ जानेवारी २०२३ दरम्यान घडला.
अधिक माहितीनुसार, हा शिक्षक गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून संबंधित शाळेत शारीरिक शिक्षक आहे. त्याने शाळेतील तीन अल्पवयीन मुलींना त्यांच्या व्हॉट्सॲपवर आय लव्ह यू असा मेसेज पाठविला. त्या शाळेत असताना त्यांना जबरदस्तीने कीस घेऊन मिठी मारत विनयभंग केला होता. दरम्यान, २४ जानेवारी रोजी शाळेत घेण्यात आलेल्या गुड टच, बॅड टच कार्यक्रमादरम्यान हा प्रकार उघड झाला. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी शिक्षकाला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.