शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूलच पार्किंगच्या विळख्यात , मगरपट्टा, हडपसरमधील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 04:32 IST

हडपसरमधील वाहतूककोंडी कमी व्हावी, यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आले असले, तरी पोलीस आणि महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे हे उड्डाणपूलच अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडले आहेत. महापालिका आणि वाहतूक पोलीस

हडपसर : हडपसरमधील वाहतूककोंडी कमी व्हावी, यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आले असले, तरी पोलीस आणि महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे हे उड्डाणपूलच अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडले आहेत. महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे मगरपट्टा चौक आणि हडपसर उड्डाणपुलांखाली सुरू असलेले उद्योग जोरात आहेत. टेम्पो, रिक्षा व इतर व्यावसायिक वाहने आणि पीएमपी बसेच तसेच हातगाडी विक्रेत्यांचे अतिक्रमण उड्डाणपुलांखाली असून, हे अनधिकृत पार्किंग वेळीच थांबविले जावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.मगरपट्टा चौक आणि हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपुलांखाली छोटे-मोठे टेम्पो व रिक्षांच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक खोळंबण्याचे प्रकार सातत्याने घडतात.मगरपट्टा चौकात उड्डाणपुलाच्या बाजूला असलेले रस्ते अरुंद आहेत. त्यातच उड्डाणपुलाखील टेम्पो , रिक्षा अचानकपणे वाहनांपुढे येतात. त्यामुळे वाहतूक खोळंबते व अपघातही घडतात.लाखो रुपये खर्च करून हडपसर उड्डाणपुलाखालून बीआरटीचा मार्ग केला आहे. त्या मार्गाच्या बाजूने अनधिकृत रिक्षा, सहाआसनी रिक्षा आणि टेम्पो ही वाहने लावली जातात. तसेच पुलाशेजारील व्यावसायिकांची चारचाकी वाहनेही याच ठिकाणी लावलेली असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरीही, महापालिका प्रशासन किंंवा पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. उड्डाणपुलाखाली अनधिकृत वाहनतळांवर कारवाई केली नाही, तर हा प्रश्न अधिक व्यापक होईल, याकडे येथील जाणकार नागरिकांनी लक्ष वेधले आहे.हडपसर उड्डाणपुलाखाली कामधेनू इस्टेट, रामानंद कॉम्लेक्स, अग्रवाल स्वीट होम आणि पीएमपी बिल्डिंगसमोरील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना तसेच उड्डाणपुलाखाली छोटे-मोठे टेम्पो रात्रंदिवस अनधिकृतपणे पार्किंग केले जातात. बंटर शाळेच्या बाजूकडील पुलाखाली रिक्षा आणि पीएमपी थांबत असल्याने वाहतूक खोळंबण्याचे प्रकार सातत्याने घडतात. उड्डाणपुलाखालील या टेम्पोच्या अनधिकृत वाहनतळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.येथील रुग्णालयात किंवा मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पाच-दहा मिंनिटेही त्यांचे दुचाकी किंंवा चारचाकी वाहन या टेम्पोचालकांकडून पार्किंग करून दिले जात नाही. या अनधिकृत पार्किंगमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून अनधिकृत वाहनतळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते आहे.

टॅग्स :Puneपुणे