Gudhi Padwa 2026: गुढीपाडव्यामुळे पुण्यातील मंडई व मार्केटयार्ड येथे फुलांचा बाजार फुलला; साखर गाठीला जोरदार मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:29 IST2026-03-18T14:28:16+5:302026-03-18T14:29:23+5:30

सणाच्या पार्श्वभूमीवर मंडईत व पेठमध्ये गुढी उभारण्यासाठी विविध प्रकारची फुले, माळा आणि साखर गाठी सह इतर सजावटीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली

Flower markets flourish at Pune's mandai and market yard due to Gudi Padwa; Strong demand for sugar cane | Gudhi Padwa 2026: गुढीपाडव्यामुळे पुण्यातील मंडई व मार्केटयार्ड येथे फुलांचा बाजार फुलला; साखर गाठीला जोरदार मागणी

Gudhi Padwa 2026: गुढीपाडव्यामुळे पुण्यातील मंडई व मार्केटयार्ड येथे फुलांचा बाजार फुलला; साखर गाठीला जोरदार मागणी

पुणे: गुढीपाडवा सण महाराष्ट्रातील नववर्षाची सुरुवात मानला जातो. या दिवशी गुढी उभारण्यासाठी विविध प्रकारची फुले, माळा आणि साखर गाठी सह इतर सजावटीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मंगळवारी मार्केटयार्डमधील फुलांच्या बाजारात सकाळपासून फूल खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. फुलांच्या किमतींमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याने झेंडू, शेवंती फुलांचे भाव घसरले.

हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. (दि. १९) गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी लागणाऱ्या साहित्याने पुण्याच्या बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. यंदा गुढीच्या उभारणीसाठी लागणाऱ्या बांबूच्या काठ्या आणि पारंपरिक साखरगाठींच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. विविध प्रकारची फुले, माळा आणि साखरगाठीसह इतर सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी मंगळवारी मंडई, पेठा आणि मार्केटयार्डमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या सणामुळे झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा यांसारख्या फुलांची मागणी वाढली आहे. तसेच, गुलाब व मोगऱ्याच्या माळांना विशेष मागणी सजावटीसाठी तयार फुलांच्या आरासांनाही चांगली विक्री झाल्याने शेतकरी आणि विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. 

सणाच्या पार्श्वभूमीवर मंडईत व पेठमध्ये गुढी उभारण्यासाठी विविध प्रकारची फुले, माळा आणि साखर गाठी सह इतर सजावटीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. मार्केटयार्डमध्ये पहाटे ३-४ वाजल्यापासूनच व्यवहार सुरू झाले. व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने फुले खरेदीसाठी दाखल झाल्याने वाहतूककोंडी झाली.

झेंडू झाला स्वस्त ४० रुपये वरून ते ३० रुपयांपर्यंत : तर मंगळवारी ५५ हजार ६९० किलो आवक

गुलटेकडी फूल बाजारात मागील दोन दिवसांपूर्वीपासून शेतकऱ्यांनी पाडव्यानिमित्त आवक रखडून ठेवली होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आवक कमी असल्याने झेंडूच्या दरात ४० रुपये होते, तर सध्या मंगळवारी बाजारात गुढीपाडवामुळे फुलांची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात ४० रुपयांवर दर आल्याने ३० रुपये झाले आहे, तर मार्केट यार्डमध्ये ५५ हजार ६९० किलो झेंडूची आवक झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक १५ ते २० टक्के वाढलेली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी बाहेरील बाजारामध्ये बाजार वाढलेले होते. मंगळवारी बाजारामध्ये अचानक आवक वाढली, त्यामुळे फुलांचे भाव कमी झाले आहेत. फुलांमध्ये झेंडू व शेवंतीला मागणी असून, आज ५५ हजार ६९० किलो झेंडूची आवक झाली आहे. - संतोष कुंभोजकर, फूल विभाग प्रमुख

मागील दोन दिवसांपूर्वी आवक कमी होते, त्यामुळे झेंडूचे भाव चाळीस रुपये ते पन्नास रुपये होते. मात्र, गुढीपाडवा आल्यामुळे फुलांना मागणी वाढली. आवक वाढल्याने झेंडूचे भाव घसरले आहेत. घाऊक बाजारात झेंडू २० ते ३० रुपये किलो आहे. - सागर भोसले, फूल व्यापारी

बाजारपेठेत चैतन्य

केवळ साखरगाठी आणि काठीच नव्हे, तर रेशमी वस्त्रे, कडुनिंबाच्या डहाळ्या, झेंडूची फुले आणि आंब्याची पाने खरेदी करण्यासाठीही पुणेकरांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. शहरातील लक्ष्मी रोड, कुंभारवाडा आणि महात्मा फुले मंडई परिसरात सकाळपासूनच मोठी उलाढाल झाली.

साखरगाठींचा गोडवा वाढला

गुढीला अर्पण केल्या जाणाऱ्या साखरगाठींना विशेष महत्त्व असते. यंदा साखरेच्या दरात झालेली किरकोळ वाढ पाहता गाठींच्या किमतीतही पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही पांढऱ्याशुभ्र आणि केशरी रंगाच्या गाठी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. लहान मुलांसाठी खास खेळण्यांच्या आकारातील साखरगाठी यंदा आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. तर २० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत साखरगाठी माळा उपलब्ध आहेत.

गुढी उभारण्यासाठी दरवर्षी नवीन बांबूची काठी घेतली जाते. फ्लॅटमध्ये लागणाऱ्या छोट्या काठीपासून ते १२ ते १५ फूट वाडा संस्कृतीमध्ये लागणाऱ्या काठ्यांची मंडईतून विक्री होते. या काठीचा दर हा ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत आहे. शहर व उपनगरातून लाखो काठींची विक्री सालाबादप्रमाणे होत असते. पुण्याच्या उपनगरांतून आणि भोर, वेल्हे परिसरातून बांबूची मोठी आवक झाली आहे. यंदाही नागरिकांचा गुढीपाडव्याचा उत्साह कायम आहे. - हरीश मोरे, बुरूड व्यावसायिक, पुणे

Web Title : गुड़ी पड़वा पर पुणे का फूल बाजार गुलजार; चीनी मालाओं की मांग।

Web Summary : गुड़ी पड़वा की तैयारियों से पुणे के बाजार जीवंत हैं। आपूर्ति बढ़ने से फूलों की कीमतों में गिरावट आई, जबकि चीनी मालाओं की मांग अधिक है। त्योहार के लिए पुणे तैयार है, बांस की छड़ें और पारंपरिक वस्तुएं तेजी से बिक रही हैं।

Web Title : Pune's flower market blooms for Gudi Padwa; sugar garlands in demand.

Web Summary : Pune's markets are vibrant with Gudi Padwa preparations. Flower prices dipped due to increased supply, while sugar garlands see high demand. Bamboo sticks and traditional items are selling fast as Pune gears up for the festival.