पुण्याच्या मार्केटयार्डमधील फुल बाजार आता १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 14:58 IST2020-03-30T14:27:33+5:302020-03-30T14:58:55+5:30
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात लग्नसराई व जत्रा,यात्रा व अन्य धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात असतात.

पुण्याच्या मार्केटयार्डमधील फुल बाजार आता १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार
पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गुलडेकडी येथील मार्केट यार्डातील फुल बाजार ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु फुल बाजार आवाराची जागा कमी असून, फुल बाजार सुरू झाल्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने फुल बाजार १५ एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व सार्वजनिक व शासकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी लग्नांचे व अन्य सर्व कार्यक्रमांचे मुहूर्त देखील पुढे ढकलण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामुळे फुलांच्या मागणीत प्रचंड मोठी घट झाली आहे. त्यातच मार्केट याडार्तील फुलांच्या व्यापा-यांनी कोरोनाच्या धास्तीने फुल बाजार 31मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता 1 एप्रिल पासून तरी फुल बाजार सुरू होईल अशी अपेक्षा शेतकरीवगार्ला होती. परंतु गुलटेकडी मार्केट याडार्तील फुल बाजार आवारामध्ये जागेचा प्रश्न आहे. फुल बाजार पुन्हा सुरू केल्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळेच बाजार समिती प्रशासनाने फुल बाजार पुढील 16 दिवसांसाठी म्हणजेच 15 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
--------
लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात लग्नसराई व जत्रा,यात्रा व अन्य धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे फुलांना चांगली मागणी आणि दर देखील चांगले मिळतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केल्याने सर्व कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. याचाच परिणाम म्हणून गेल्या आठ- दहा दिवसांपासून फुल बाजार बंद असून, आता यामध्ये 15 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. याचा फुल उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटाका बसला आहे.
- राम ढमाले, खेड फुलांचे शेतकरी