शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

माळीण अद्याप पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 29, 2015 23:43 IST

निसर्गाच्या कोपाने जगाच्या पाठीवरुन पुसल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला सहा महिने झाले असतानाही या गावाच्या पूनर्वसनाचा तिढा अद्याप कायम

निलेश काण्णव, घोडेगावनिसर्गाच्या कोपाने जगाच्या पाठीवरुन पुसल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला सहा महिने झाले असतानाही या गावाच्या पूनर्वसनाचा तिढा अद्याप कायम आहे़ प्रशासनाच्या वतीने पर्यायी जागेच्या शोधाचा प्रयत्न सुरु आहे़ ग्रामस्थांचे प्रशासनाला आवश्यक तेवढे सहकार्य न मिळाल्याने जागेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही़.दुर्घटना ३० जुलै रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली. यामध्ये १५१ लोक दगावले. या दुर्घटनेला सहा महिने पूर्ण होत आहेत. बचावलेले माळीण ग्रामस्थ धक्क्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थांना सावरण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. शासनाने ११ कोटी २८ लाख रुपयांचे वाटप आत्तापर्यंत केले आहे. तसेच, ४० तात्पुरती निवारा शेड बांधून दिली आहेत; मात्र कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या ८ एकर जागेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रशासन सुरुवातीपासून खूप प्रयत्न करीत आहे. मुळात माळीण गाव व त्याचा परिसर पाहिला असता, सर्व उंच डोंगराळ भाग आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठी सपाटीची, सुरक्षित व लोकांच्या सोईची जागा मिळणे अवघड. तसेच, माळीणचे पुनर्वसन केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा असे घडू नये. यासाठी जीएसआयला जागा दाखवून त्यांची मान्यता घेणे महत्त्वाचे. पुणे, मुंबई शहरांमध्ये राहणाऱ्या माळीण ग्रामस्थांनी सुरुवातीला पेठ, मंचर, घोडेगाव, डिंभे अशा ठिकाणी पुनर्वसन व्हावे, अशी मागणी केली होती, तर माळीणमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आम्हाला येथेच जवळपास पुनर्वसन करून द्या, अशी अग्रही भूमिका ठेवली. त्यामुळे प्रशासनाने माळीणच्या जवळपास जागेचा शोध सुरू केला.माळीणचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी सप्टेंबर २०१४ मध्ये झांजरेवाडी, कोकणेवाडी व अडिवरे या तीन जागा पाहण्यात आल्या. यापैकी झांजरेवाडी व कोकणेवाडी जागेला जागा मालकांनी संमती दिली, तर अडिवरेची जागा देण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. झांजरेवाडी जागेला जीएसआयने मान्यता दिली, तर कोकणेवाडीची जागा लांब असल्याने माळीण ग्रामस्थांनी या जागेला नकार दिला. दरम्यान, अडिवरे ग्रामस्थांशी पुन्हा बोलणी करण्यात आली; मात्र त्यांनी कडक शब्दांत जागा देण्यास विरोध केला. त्यामुळे प्रशासनाने झांजरेवाडीमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला.