Pune: खानापूरजवळ गोळीबार; एका तरुणाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 13:25 IST2024-09-15T13:25:14+5:302024-09-15T13:25:27+5:30
रात्री वाद मिटविण्याच्या उद्देशाने दोन गट एकत्र जमले असता पुन्हा वाढ होऊन अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना रात्री घडली

Pune: खानापूरजवळ गोळीबार; एका तरुणाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
धायरी: घेरा सिंहगड गावाच्या हद्दीतील खानापूर जवळील सांबरेवाडी येथे दोन गटांमध्ये वाद होऊन अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच
हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांबरेवाडी येथे दोन गटात वाद झाले होते. दरम्यान शनिवारी रात्री वाद मिटविण्याच्या उद्देशाने दोन गट एकत्र जमले. त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. यामध्ये एका गटाने गावठी पिस्तूलांतून अंदाधुंद गोळीबार केला. यात रोहित ढीले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून अजूनही तो जखमी तरुण बेशुद्ध अवस्थेत आहे. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून यातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना झाली असल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली आहे.