शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या भंगाराला आग

By admin | Updated: April 18, 2017 02:34 IST

येथील वीज वितरण कंपनीच्या शहर कार्यालयालगत असलेले जुने मीटर, बॉक्स, केबल व इतर स्क्रॅप साहित्याला अचानक आग लागल्याने सर्व साहित्य जाळून खाक झाले.

नारायणगाव : येथील वीज वितरण कंपनीच्या शहर कार्यालयालगत असलेले जुने मीटर, बॉक्स, केबल व इतर स्क्रॅप साहित्याला अचानक आग लागल्याने सर्व साहित्य जाळून खाक झाले. या आगीत सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी दुपारी ३. ३० वा. घडली. जुन्नर नगर परिषदेचा अग्निशामक दलाचा बंब वेळेवर आल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले.नारायणगाव येथील वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या जवळ असणाऱ्या शहर कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या पटांगणात दुपारी ३ वा.च्या सुमारास अचानक गवताने पेट घेतला. वीज कर्मचाऱ्यांनी ती आग झाडांच्या हिरव्या फांद्या तोडून विझवली होती. त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास अचानक शहर कार्यालयामागे जुने मीटर, बॉक्स, केबल व इतर स्क्रॅप साहित्य असलेल्या जागेत आग लागल्याचे एका कर्मचाऱ्याला दिसले. त्यांनी ही माहिती उपविभागीय अभियंता उमेश कर्पे यांना देऊन इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु हवेचा वेग जास्त असल्याने तसेच गवत वाळले असल्याने आगीने तीव्र रूप धारण केले. कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांनी आग पाहताच कार्यालयातील संगणक, महत्त्वाच्या फाईली, इतर साहित्य कार्यालयाबाहेर काढण्यास सुरुवात केली. तसेच आगीपासून वाचण्यासाठी कर्मचारी कार्यालयाबाहेर आले. आग आटोक्यात आणणे शक्य न झाल्याने कर्पे तसेच कर्मचारी होले यांनी जुन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाशी संपर्क करून माहिती दिली. अग्निशामक दलाचे राजू चव्हाण व त्यांचे सहकारी गाडी घेऊन अवघ्या १५ मिनिटांत घटनास्थळी आले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. चव्हाण यांनी सहकार्यांच्या मदतीने थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील घटना टळली. वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता उमेश कर्पे म्हणाले, की आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कार्यालयाच्या पाठीमागे कर्मचारी वसाहतीच्या जवळ मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत आहे. दुपारी आग विझविण्यात आली होती पण परत त्यानंतर अचानक वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने पुन्हा आग लागून ही घटना घडली आहे. (वार्ताहर)