पुण्यात फटाक्यांमुळे तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना; काेणीही जखमी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 12:26 PM2023-11-13T12:26:33+5:302023-11-13T12:27:37+5:30

अग्निशमन नियंत्रण कक्षास आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी धाव घेत आग आटाेक्यात आणली

Fire incidents in 23 places due to firecrackers in Pune No one was injured | पुण्यात फटाक्यांमुळे तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना; काेणीही जखमी नाही

पुण्यात फटाक्यांमुळे तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना; काेणीही जखमी नाही

पुणे : लक्ष्मीपूजनानंतर रात्री पुणेकरांनी फटाक्यांची आतषबाजी करीत दीपावली साजरी केली. दरम्यान, रात्री फटाक्यांमुळे शहरातील विविध भागात आग लागल्याचे २३ प्रकार उघडकीस आले. अग्निशमन नियंत्रण कक्षास आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत आग आटाेक्यात आणली. आगीच्या घटनांत काेणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली.

लक्ष्मीपूजनानंतर रात्री सातनंतर नागरिकांनी फटाके वाजविण्यास सुरुवात झाली. आगीची पहिली वर्दी ७ वाजून ३८ मिनिटाला आली. रास्ता पेठेत के.ई.एम हाॅस्पिटलजवळ एका इमारतीच्या टेरेसवर आग लागल्याचा प्रकार घडला. काेथरूड येथील सुतार दवाखान्याजवळ एका दुकानात आग लागली. रात्री सव्वाआठ वाजता वडारवाडी पांडवनगर पाेलिस चाैकीजवळ घरामध्ये आग लागली. साडेआठ वाजता काेंढवा बुद्रूक पाेलिस चाैकीसमाेर कचऱ्याला आग लागल्याचा प्रकार घडला.

रात्री आगीच्या २३ घटना घडल्या आहेत. दहा मिनिटांत नाना पेठेतील चाचा हलवाई जवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर सदनिकेत आग लागली. घाेरपडी पेठेत आपला मारुतीजवळ झाडाने पेट घेतला. काेंढवा शिवनेरी नगर येथे इमारतीच्या टेरेसवर तर वारजेतील आदित्य गार्डन, फ्लाेरा साेसायटीत घरात आग लागली. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ पाेलिस चाैकीसमाेर जुन्या वाड्यात आग भडकली. चार गाड्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू हाेते. ७ ते ११ च्या दरम्यान आगीच्या तब्बल २३ घटना घडल्या आहेत. 

घरात आग लागल्याचे प्रकारात वाढ

फटाक्यांमुळे सदनिका तसेच घरात आग लागल्याचे सर्वाधिक प्रकार घडले. बाहेरून फटाका उडून आल्यामुळे तसेच अन्य कारणामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले.

शहरात आगीच्या २३ घटनांची नोंद 

१) वेळ राञी ०७•३८ - रास्ता पेठ, के ई एम हॉस्पिटल जवळ एका इमारतीत टेरेसवर आग

२) वेळ राञी ०७•४० - कोथरुड, सुतार दवाखान्या जवळ दुकानामध्ये आग

३) वेळ राञी ०८•१८ - वडारवाडी, पांडवनगर पोलिस चौकीजवळ घरामध्ये आग 

४) वेळ राञी ०८•२४ - कोंढवा बुद्रुक पोलिस चौकीसमोर कचरयाला आग

५) वेळ राञी ०८•५० - नाना पेठ, चाचा हलवाई जवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर घरामध्ये आग 

६) वेळ राञी ०८•५२ - घोरपडी पेठ, आपला मारुती मंदिराजवळ झाडाला आग 

७) वेळ राञी ०८•५७ - कोंढवा, शिवनेरी नगर येथे इमारतीत टेरेसवर आग 

०८) वेळ राञी ०८•५८ - वारजे, आदित्य गार्डन, फ्लोरा सोसायटीत घरामध्ये आग

०९) वेळ राञी ०९•०० - शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर वाड्यामध्ये आग

१०) वेळ राञी ०९•१३ - केशवनगर-मुंढवा रस्ता, गुडविल सोसायटीत घरामध्ये आग 

११) वेळ राञी ०९•२७ - आंबेगाव पठार, चिंतामणी शाळा येथे भंगार दुकानामध्ये आग

१२) वेळ राञी ०९•३१ - शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर तिसरया मजल्यावर आग

१३) वेळ राञी ०९•३२ - गुरुवार पेठ, कृष्णाहट्टी चौक येथे दुकानामध्ये आग

१४) वेळ राञी ०९•५० - हडपसर, रासकर चौक येथे एका घरामध्ये आग 

१५) वेळ राञी ०९•५१ - पिसोळी, खडी मशीन चौक येथे अदविका फेज १ येथे घराच्या गॅलरीमध्ये आग

१६) वेळ राञी १०•०८ - रास्ता पेठ, आगरकर शाळेजवळ छतावर कागदाला आग

१७) वेळ राञी १०•०९ - लोहगाव, शिवनगर, वडगाव शिंदे रोड इमारतीत गॅलरीमध्ये आग 

१८) वेळ राञी १०•२३ - विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ इमारतीत गॅलरीत आग 

१९) वेळ राञी १०•२८ - वडारवाडी, पांडव नगर येथे घरामध्ये आग 

२०) वेळ राञी १०•३४ - धानोरी, विठ्ठल मंदिर येथे गवताला आग  

२१) वेळ राञी १०•४३ - गुरुवार पेठ, मामलेदार कचेरी जवळ घरामध्ये आग

२२) वेळ राञी १०•५२ - बी टी कवडे रोड, सोलेस पार्कसमोर घरामध्ये आग 

२३) कोंढवा, शिवनेरी नगर, ब्रम्हा एवेन्यू सोसायटी येथे गच्चीवर टॉवरला आग 

Web Title: Fire incidents in 23 places due to firecrackers in Pune No one was injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.