गणेश पेठेत गादी कारखान्याला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

By विवेक भुसे | Updated: December 25, 2023 12:15 IST2023-12-25T12:14:10+5:302023-12-25T12:15:27+5:30

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे

Fire breaks out at Gadi factory in Ganesh Peth Burn all ingredients | गणेश पेठेत गादी कारखान्याला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

गणेश पेठेत गादी कारखान्याला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

पुणे : गणेश पेठेतील दारुवाला पुलाजवळील गादी कारखान्याला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. त्यात कारखान्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले. कारखाना बंद असल्याने कोणतीही प्राणहानी झाली नाही.

गणेश पेठेतील दारूवाला पुलाजवळील मस्जिद ट्रस्टच्या आवारामध्ये एक गादी कारखाना आहे. कारखाना बंद असताना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या कारखान्याला आग लागली. कापूस, कापड असे साहित्य असल्याने आगीचे पटकन रौद्र रुप धारण केले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे २ फायरगाड्या व २ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली. सध्या तेथे कुलिंगचे काम सुरु आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Fire breaks out at Gadi factory in Ganesh Peth Burn all ingredients