देऊळ गावातील जॅक्सन कंपनीला आग; राज्य विद्युत महामंडळाला लागणारे इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 20:37 IST2025-01-21T20:37:12+5:302025-01-21T20:37:42+5:30

केडगाव : देऊळगाव गाडा (ता. दौंड) येथील जॅक्सन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील गोडाऊनला दि. २१ रोजी पहाटे अचानक आग ...

Fire at Jackson Company in Deulgaon | देऊळ गावातील जॅक्सन कंपनीला आग; राज्य विद्युत महामंडळाला लागणारे इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक

देऊळ गावातील जॅक्सन कंपनीला आग; राज्य विद्युत महामंडळाला लागणारे इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक

केडगाव : देऊळगाव गाडा (ता. दौंड) येथील जॅक्सन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील गोडाऊनला दि. २१ रोजी पहाटे अचानक आग लागली. त्यामध्ये कंपनीचे उत्पादन इलेक्ट्रिक साहित्य निर्मिती असे आहे. गोडाऊन मध्ये ठेवलेले इलेक्ट्रिक साहित्याला आग लागली. त्या आगीत इलेक्ट्रिक साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. त्याची किंमत सुमारे ४० ते ५० लक्ष रुपये असल्याची प्राथमिक माहिती यवत पोलीस ठाणे अंकित पाटस पोलीस ठाण्यात देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला लागणारे इलेक्ट्रिक साहित्य ही कंपनी पूरवत होती. अचानक लागलेल्या या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र कंपनीचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची फिर्याद सुरज कुमार दिग्विजय प्रसाद, वय ३४, व्यवसाय नोकरी रा. केडगाव आनंदग्राम सोसायटी यांनी दिली. आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाचा वापर करण्यात येऊन आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक तपास पाटस पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत. 

Web Title: Fire at Jackson Company in Deulgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.