शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

तळीये गावाच्या मदतीसाठी 'माळीण' सरसावलं; तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणत मदतीचा हात पुढं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:10 IST

पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर देखील ७ वर्षांपूर्वी अशाचप्रकारे डोंगर कोसळून मोठी जीवितहानी झाली होती.

पुणे : महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळून अनेक कुटुंब उध्वस्त झाली तर अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला. अद्यापही शोधकार्य सुरु असून काही नागरिक बेपत्ता आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर देखील ७ वर्षांपूर्वी अशाचप्रकारे डोंगर कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. पण आता हेच 'माळीण' सामाजिक बांधिलकी जपत तळिये गावाच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. 

कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, वर्धा, चिपळूण, पुणे, सातारा अशा बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून दुसरीकडे दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून जनावरे वाहून गेली आहेत तर लाखांवर नागरिकांचे स्थलांतरण कऱण्यात आले आहे. महाड तालुक्यातील तळीये गावावर देखील दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात अनेक कुटुंब जमीनदोस्त झाली. तसेच जवळपास ढिगाऱ्याखालून तब्बल ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून. अद्यापही ३२ नागरिक बेपत्ता आहे येथील नागरिकांवर  या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी काही काळ लागणार आहे. राज्य सरकारसह सामाजिक संस्था देखील तळीये गावाच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.याच दरम्यान आता पुणे जिल्ह्यातील माळीण गावाने आदर्श उभा केला असून तळीये गावाच्या मदतीसाठी २५ हजारांची आर्थिक मदत दिली आहे.

माळीणच्या नागरिकांनी तळीये गावाच्या मदतीसाठी २५ हजारांचा धनादेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला आहे.या पार्श्वभूमीवर माळीणच्या नागरिकांनी तळीये गावावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटावर आपल्या भावना व्यक्त करताना ''आम्ही तुमचं दुःख जाणतो..'' म्हटले आहे. माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी २५ हजाराची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली आहे.

७ वर्षांपूर्वीच्या 'त्या' काळरात्रीची आठवण ताजी....पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वसलेल्या माळीण गावावर देखील ३० जुलै २०१४ च्या रात्री मोठं संकट कोसळले होतं. डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४४ घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. तर १५१ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या ६ वर्षात या गावातील नागरिक पुन्हा एकदा उभे राहिले आहेत. माळीण गावातील नागरिकांनी तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणून तळीयेतील ग्रामस्थांच्या मदतीसाठी मोठी मदत देऊ केली आहे. 

जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा; तळीये ग्रामस्थांची मागणी तळीये येथे मागील पाच दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आजही पथकांकडून सुरु असलेलं रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. मात्र यावेळी नागरिकांनी पथकाला जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी केली.याचवेळी आमच्या पुनर्वसनाचा तातडीने विचार करून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे.

टॅग्स :Puneपुणेmahad-acमहाडRainपाऊसfloodपूरAccidentअपघातState Governmentराज्य सरकारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील