शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाचीला अपघातात आर्थिक मदत; १ महिना मुलीचा हप्ता थकला, बाउन्सरकडून घरात शिरून मारहाण

By नितीश गोवंडे | Updated: March 28, 2025 17:43 IST

मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा १ महिन्याचा हप्ता भरता न आल्याने एकाला घरात शिरून मारहाण करण्यात आली

पुणे : खासगी वित्तीय संंस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने घरात शिरून बाउन्सरने एकाला मारहाण केल्याची घटना वानवडी भागात घडली. याप्रकरणी वानवडीपोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली. आकाश पुरुषोत्तम सापा (३२, रा. भवानी पेठ) आणि ऋषिकेश नागनाथ चंदनशिवे (२६, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खासगी वित्तीय संस्थेचा व्यवस्थापक हर्षद जिमन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वानवडीतील शांतीनगर भागात राहायला आहेत. तक्रारदार हे स्वत: बँकेतील कर्जप्रकरणे मार्गी लावण्यासाठी मध्यस्थी करतात. त्यासाठी त्यांना कर्जदार, तसेच बँकेकडून काही मोबदलाही मिळतो. तक्रारदाराने मुलीच्या शिक्षणासाठी सात लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज शिवाजीनगर भागातील एका खासगी वित्तीय संस्थेकडून घेतले होते. कर्ज मंजूर झाल्यानंतर रकमेतून विम्यापोटी ४३ हजारांची रक्कम कापून घेण्यात आली. कर्ज मंजुरी प्रक्रिया शुल्क कापून घेण्यात आले. त्यांच्या खात्यात सहा लाख ८५ हजार रुपये जमा करण्यात आले. दरमहा १८ हजार ७० रुपये हप्ता ठरविण्यात आला. त्यानंतर त्यांनी नियमितपणे २४ हप्ते भरले. दरम्यान, त्यांच्या १७ वर्षीय भाच्याचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्यांनी काही आर्थिक मदत बहिणीला केली.औषधोपचारासाठी पैसे दिल्याने त्यांचा एक महिन्याचा हप्ता थकला. २ मार्च राेजी त्यांनी हप्ता भरला नाही. त्यानंतर २५ मार्च रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला. हप्ता थकल्याने त्यांना शिवीगाळ करून धमकावण्यात आले. त्यानंतर ते २६ मार्च रोजी स्वत: शिवाजीनगर भागातील वाकडेवाडीत असलेल्या वित्तीय संस्थेच्या कार्यालयात गेले. हप्ता का थकला, याबाबतचे कारणही त्यांनी दिले. गुरुवारी (दि. २७) सायंकाळी तक्रारदार आणि त्यांचा भाऊ घरात होता. त्यावेळी दोनजण त्यांच्या घरात आले. आम्ही खासगी वित्तीय संस्थेतून आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी तक्रारदाराने त्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. दोघांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. थकलेल्या हप्त्याची रक्कम घेतल्याशिवाय जाणार नाही, असे सांगून दोघांनी तक्रारदार आणि त्यांच्या भावाला मारहाण केली.

त्यानंतर तक्रारदाराने पोलिस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसंनी चौकशी केली. तेव्हा मारहाण करणाऱ्या बाउन्सरने खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापक हर्षद जिमन याच्या सांगण्यावरून आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. मारहाण केल्याप्रकरणी दोघांनी अटक करण्यात आली असून, व्यवस्थापक जिमन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वानवडी पोलिसांनी दिली. सहायक फौजदार साबळे तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWanvadiवानवडीPoliceपोलिसMONEYपैसाSocialसामाजिकEducationशिक्षण