शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी आरोपपत्र दाखल

By admin | Updated: July 9, 2014 23:53 IST

पोलिसांनी बसचालक व वाहकाविरुद्ध विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

पुणो : सिंहगड स्पिं्रगडेलच्या शाळेच्या बसमध्ये चार वर्षाच्या चिमुरडीचा अमानुष लैंगिक छळ केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी बसचालक व वाहकाविरुद्ध विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
अमोल मारुती शेरकर (25 रा. साई हाइट्स, वडगाव बुद्रुक, ता. हवेली,  मूळ रा. मु. पो. भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) व विनायक भिकाजी कारंडे (25 रा. वडगाव बुद्रुक ता. हवेली, मूळ रा. मु. पो. बलवडी ता. सांगोला, जि. सोलापूर) या दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  दोघांवर 376 (आय), 354, 34 तसेच लहान मुलांवरीर लैंगिक अत्याचार कलम 5 (एम), 6 , कलम 7 , 8 नुसार आरोप ठेवण्यात आले आहे.  
मुख्याध्यापिका सुजाता संजीव कारंजकर (49, रा. कोथरूड) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली. 
दोन्ही आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील असून, व्यवसायानिमित्त पुण्यात आले. दोघेही स्प्रिंगडेल शाळेच्या बसवर कर्मचारी म्हणून कामास लागले. दि. 5 एप्रिल रोजी त्यांनी शाळेच्या बसमध्ये के.जी. वर्गात शिकणा:या चार वर्षाच्या चिमुरडीवर घृणास्पद लैंगिक अत्याचार केला. याबाबत मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर हा प्रकार मुलीच्या पालकांनी वर्गशिक्षिका व शाळेच्या मुख्याध्यापिकांना सांगितला. तीन दिवसांनंतरही दोषींवर कारवाई न झाल्याने, त्यांनी पालक संघटनेचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर पालकांनी जमून निषेध व्यक्त करत शाळेची तोडफोड केली. घडलेल्या प्रकरणानंतर शहरामध्ये खळबळ उडाली होती. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी हे आरोपपत्र दाखल केले. (प्रतिनिधी)
 
अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन
4पुणो : रक्त तपासणीसाठी लॅबमध्ये गेलेल्या महिलेच्या 12 वर्षीय मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. नितीन दिगंबर पाटील (वय 24, रा. राजीवनगर, विमाननगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिची आई विमाननगर येथील पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त तपासणीकरिता गेल्या होत्या. फिर्यादी महिला मायक्रोस्कोपमधून पहात असताना त्यांची मुलगी पाठीमागे उभी होती. या महिलेचे लक्ष नसताना पीडित मुलीशी अश्लील वर्तन केले.