महाराष्ट्र जनतेला उकसवणाऱ्या राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करा; पुण्यात स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 15:46 IST2022-04-24T15:40:45+5:302022-04-24T15:46:13+5:30
रवि राणा व नवनीत राणा यांनी अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. व महाराष्ट्राच्या जनतेला उकसावण्याचा प्रयत्न केला

महाराष्ट्र जनतेला उकसवणाऱ्या राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करा; पुण्यात स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार
पुणे : मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवासस्थानी मातोश्री बंगल्यासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार आहोत. असे आव्हान नवनीत आणि रवी राणा यांनी दिले होते. काल सकाळी ते मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार होते. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या घरासमोर ठिय्या मांडून बसले होते. हिम्मत असेल तर मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा म्हणून दाखवा. असे आव्हानही शिवसैनिकानी दिले होते. राणा दाम्पत्य माघार घेण्यास तयार नव्हते. शिवसैनिकांची गर्दी पाहून ते घराबाहेरही आले नाहीत. अखेर पोलिसांनी घरात घुसून त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक केली.
अटक करतेवेळी रवि राणा व नवनीत राणा यांनी अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. व महाराष्ट्राच्या जनतेला उकसावण्याचा प्रयत्न केला, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज्यशासना विरुद्ध कट करणे, शिवीगाळ करणे ह्यासाठी नवनीत राणा व रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी स्वारगेटपोलिस स्टेशन मध्ये अर्ज करण्यात आला आहे. नवनीत राणा व रवी राणा हे जाणून बुजून दंगली घडवण्याची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नवनीत राणा व रवि राणा ह्याच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे असा अर्ज चित्रपट निर्मात्ते निलेश नवलाखा व सामाजिक कार्यकर्ते संग्राम होनराव यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक श्री सोमनाथ जाधव यांच्या कडे अर्ज केला आहे