मंगलदास बांदल याच्यावर पाचवा गुन्हा दाखल; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले गहाण खत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 01:00 PM2021-07-31T13:00:49+5:302021-07-31T13:01:39+5:30

शिवाजीराव भोसले बँकेतील अधिकार्‍याचाही सहभाग

Fifth case filed against Mangaldas Bandal; Mortgage made of land showing fear of revolver | मंगलदास बांदल याच्यावर पाचवा गुन्हा दाखल; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले गहाण खत

मंगलदास बांदल याच्यावर पाचवा गुन्हा दाखल; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले गहाण खत

Next

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल याच्याविरुद्ध आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांदल याने एका शेतकर्‍याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले व परस्पर ६ कोटी ७५ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये शिवाजीराव भोसले बँकेतील एका अधिकार्‍याचा सहभाग आहे. 

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मंगलदास बांदलसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध ३४२, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३४ सह आर्म अ‍ॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी गंगाराम सावळा मासाळकर (वय ७४, रा. वढु खुर्द, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार वढु खुर्द येथे २०१३ मध्ये व त्यानंतर वेळोवेळी घडला आहे.

फिर्यादी यांची हवेली तालुक्यात गट क्र. १५३/१ मध्ये ३ हेक्टर ७१ आर जमीन आहे. बांदल व इतरांनी फिर्यादी यांना चारचाकी गाडीमध्ये डांबून ठेवून दमदाटी करुन व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले. तसेच त्यांच्या परस्पर ६ कोटी ७५ लाख रुपये काढून घेतले. या जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांची मागणी केली. त्याचे राजकीय लांगेबांधे असल्याचे फिर्यादी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यास ते फिर्यादीच्या कुटुंबियांना त्रास देतील म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली नव्हती. त्यांनी अद्यापर्यंत फिर्यादीचे जमिनीवरील बोझा कमी केला नाही. 

पुण्यातील सराफ व्यावसायिकाला ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पुणे पोलिसांनी मार्च २०२० मध्ये अटक केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे़

शिक्रापूर पोलीस ठाण्यात मंगलदास बांदल याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. शिक्रापूर येथील दत्तात्रय मांढरे यांच्या फिर्यादीवरुन बांदल यांना शिक्रापूर पोलिसांनी २६ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असताना रवींद्र सातपुते यांची फिर्याद दाखल झाली होती.

Web Title: Fifth case filed against Mangaldas Bandal; Mortgage made of land showing fear of revolver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app