शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक नाल्याला कुंपणाची सुरक्षा

By admin | Updated: June 27, 2017 07:39 IST

नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, या विरोधात आंदोलने झाली, मात्र पावसाळा सुरू झाला तरी रेल्वे प्रशासन सुरक्षाकवच देण्याकडे

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, या विरोधात आंदोलने झाली, मात्र पावसाळा सुरू झाला तरी रेल्वे प्रशासन सुरक्षाकवच देण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. ढापे नसल्याने हा नाला धोकादायक ठरत आहे.गेल्या पंधरवड्यात नाल्यात पाय घसरून महादेव शितोळे (वय ४२, रा. अजनुज, ता. श्रीगोंदा) ही व्यक्ती पडली. नाल्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत गेल्याने त्यांचा दुर्दैैवी मृत्यू झाला. यानंतर नाल्यावर ढापे बसवावेत म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना आणि राजकीय मंडळींनी आंदोलने केली. मात्र याचे कुठलेही सोयरसुतक रेल्वे प्रशासनाला दिसत नाही. पावसाळ्याच्या तोंडावर ‘लोकमत’ने नाल्याची पाहणी केली. येथील शालीमार चौकातून रेल्वे नाल्याचा उगम झाला आहे. शहरी भागातून हा नाला भीमा नदीला जोडला गेला आहे. साधारणत: पाऊण किलोमीटरचा असून पाच ते सात फूट खोली, तीन ते चार फूट रुंदी आहे. येथील रेल्वे कुरकुंभ मोरी, नेने चाळ, खाटिक गल्ली, इंदिरानगर झोपडपट्टी या नागरी वस्तीतून अनेक वर्षांपासून हा नाला मार्गस्थ आहे. नाल्यामधील रेल्वेचे सांडपाणी कायमच वाहत असल्याने या नाल्याच्या दुतर्फा राहात असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीचा उपद्रव नागरिकांना सोसावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी सूचना देऊन देखील काही उपयोग आजपावेतो झालेला नाही. प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप आणि आंदोलने झाल्यामुळे नाईलाजास्तव रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ नाल्याच्या बाजूला लोखंडी कुंपण घातले आहे. मात्र नाला आहे तसाच असून, यावर ढापे टाकले नाहीत. परिणामी कुठलीही सुरक्षितता नाही. पावसाळ्यात या नाल्यात केव्हा काय विपरित घडेल याची शाश्वती नाही.