शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पतीच्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरची विषारी इजेंक्शन घेऊन आत्महत्या; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 7:09 PM

कोविडच्या काळात देखील एकाच दिवशी दहा महिलांची प्रसुती केल्याबद्दल झाला होता सन्मान

ठळक मुद्देमयत महिला आणि त्यांचे पती दोघेही व्यवसायाने डॉक्टर

पुणे :  दारू पिऊन शिवीगाळ करीत चारित्र्यावर संशय घेण्याच्या पतीच्या त्रासाला कंटाळून नैराश्यात असलेल्या एका डॉक्टर महिलेने इंजेक्शनचा डोस घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली.  याप्रकरणी पतीवर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मनिषा रमेश कदम (वय.45,रा.वारजे माळवाडी, मुळ मेढा)  असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. रमेश नारायण कदम (रा.वेन्ना चौक,ता. मेढा,जि.सातारा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी डॉक्टर महिलेची आई मालन अलसे (वय.66, वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मनिषा आणि त्यांचे पती दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. पतीचे सातारा जिल्ह्यातील मेढ्यात हॉस्पिटल आहे. 2006 मध्ये मनिषाचा विवाह झाला. रमेश नेहमी दारुच्या नशेत तिला मारहाण आणि चारित्र्याच्या संशयावरुन शिवीगाळ करीत होता. त्यातूनच अनेकदा उपाशी ठेवले जात होते. त्याने मनिषाला माहेरी सोडल्यावर पुन्हा नांदण्यास नेले नाही.

मागील काही महिन्यापासून त्या माहेरी आपल्या आई-वडिलांकडे वास्तव्यास होत्या. काही दिवसांपासून त्या पालिकेच्या रुग्णालयात काम पाहत होत्या. कोविडच्या काळात देखील एकाच दिवशी दहा महिलांची प्रसुती करण्याचे काम केल्याबद्दल त्यांना सन्मानित  करण्यात  आले होते.त्यांच्या सासरच्या मंडळीसोबत सामोपचारासाठी एक बैठक देखील झाली होती. त्यावेळी पतीने त्यांना सासरी नेण्यास नकार दिला होता. त्यांची मोठी मुलगी पतीकडे वास्तव्यास होती तर लहान त्यांच्यासोबत होती. त्यांना मुलीली भेटता येत नव्हते. त्यामुळे मागील काही दिवसापासून त्या नैराश्यात होत्या. त्यातून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी इंजेक्शनचा डोस घेत आत्महत्या केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस.एस कथले करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPregnancyप्रेग्नंसीDeathमृत्यूdoctorडॉक्टरWomenमहिला