'तुझे मेरे लिये ही लाया है" म्हणत पत्नी अन् मुलाच्या गैरहजेरीत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 13:36 IST2022-04-30T13:33:42+5:302022-04-30T13:36:25+5:30

पुण्यातील धक्कादायक घटना

father-in-law raped on woman in the absence of his wife and son pune crime | 'तुझे मेरे लिये ही लाया है" म्हणत पत्नी अन् मुलाच्या गैरहजेरीत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

'तुझे मेरे लिये ही लाया है" म्हणत पत्नी अन् मुलाच्या गैरहजेरीत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

पुणे : पुण्याच्या सहकारनगर परिसरातून नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मुलगा आणि पत्नी घरात नसताना सासऱ्यानेच सुनेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धनकवडी तळजाई पठार परिसरात ही घटना घडली. सहकारनगरपोलिस ठाण्यात या प्रकरणी 47 वर्षीय नराधम सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 वर्षीय सुनेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे लग्न झाल्यापासून आरोपी सासरा हा तिच्यावर मुलीसारखे प्रेम करत असल्याचे भासवत होता. काही दिवसापूर्वी फिर्यादीची सासू काही कामानिमित्त बाहेर राज्यात गेली होती. तर पति देखील काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. यावेळी आरोपीने तिच्या बेडरूम मध्ये प्रवेश करून तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादीने त्याला विरोध केला असता, ' तुझे मेरे लिये ही लाया हु म्हणत' जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने तिच्यासोबत बलात्कार केला. दरम्यान बदनामीच्या भीतीने फिर्यादीने याविषयी कुणाला सांगितले नाही. याचाच फायदा घेऊन आरोपीने नंतर संधी साधून तीन वेळा फिर्यादीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर फिर्यादी विषयी कुटुंबीयांना चिथावणी देऊन तिच्याविषयी इतरांचे मन कलुषित केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे करीत आहेत.

Web Title: father-in-law raped on woman in the absence of his wife and son pune crime